ब्रेकिंग

प्रकाशवाट पुस्तक कठीण प्रसंगातून यशासाठी मार्गदर्शक – माजी मंत्री बाळासाहेब थोरात

सुधाकर जोशी यांच्या प्रकाश वाट पुस्तकाचे प्रकाशन

प्रकाशवाट पुस्तक कठीण प्रसंगातून यशासाठी मार्गदर्शक – माजी मंत्री बाळासाहेब थोरात

प्रकाशवाट पुस्तक कठीण प्रसंगातून यशासाठी मार्गदर्शक – माजी मंत्री बाळासाहेब थोरात
सुधाकर जोशी यांच्या प्रकाश वाट पुस्तकाचे प्रकाशन
संगमनेर । प्रतिनिधी । प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक पुस्तक दडलेले असते. प्रत्येकाने जीवनात मागे वळून पाहताना आपले सिंहावलोकन केले पाहिजे. संघर्ष केल्याने यशाचे समाधान मिळत असून सुधाकर जोशी यांच्यावरील प्रकाशवाट हे पुस्तक सर्वांसाठी कठीण प्रसंगातून यश मिळवण्यासाठी मार्गदर्शक ठरेल असा विश्वास मा. महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे.

मालपाणी लॉन्स येथे अमृतवाहिनी बँकेचे चेअरमन सुधाकर जोशी यांच्या जीवन कार्यावर डॉ. संतोष खेडलेकर यांनी लिहिलेल्या प्रकाशवाट या पुस्तकाच्या अनावर प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मा आमदार डॉ सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, सौ कांचनताई थोरात, सौ संजीवनी जोशी, श्रीमती प्रभावती जोशी, डॉ जयश्रीताई थोरात, माऊली सेवा प्रतिष्ठानचे डॉ. राजेंद्र धामणे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, संघर्ष केल्यानेच यशाची खरे समाधान मिळते. सुधाकर जोशी यांनी चांगल्या संस्कारातून एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून अत्यंत प्रामाणिक सेवा दिली आहे. बँकिंग क्षेत्रात त्यांचे काम मोठे असून त्यांच्या जीवनातील अनुभवांचे प्रकाशवाट हे पुस्तक आहे.

प्रत्येकाच्या जीवनात चढ-उतार असतात परंतु संघर्षातून पुढे आल्यानंतर जीवनाचा खरा आनंद मिळतो. प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक कथा दडलेली असून यशस्वी ते साठी प्रत्येकाने जीवनाचे सिंहावलोकन करावे असे आवाहन त्यांनी केले.तर डॉ तांबे म्हणाले की, संगमनेरच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये डॉक्टर संतोष खेडेकर यांचे मोठे योगदान असून सुधाकर जोशी हे राज्यातील एक कर्तबगार अधिकारी आहेत त्यांचा जीवन प्रवास हा नवीन पिढ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी असल्याचे ते म्हणाले.

आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, बँकिंग क्षेत्रात काम करताना सुधाकर जोशी यांनी अनेक माणसे जोडली. प्रत्येकाने आपल्या जीवनाचा इतिहास लिहावा अशी प्रेरणा या पुस्तकातून मिळणार आहे. जगातील राजकारण हे सध्या प्रपोंडावर चालत असून संगमनेरात मात्र सत्य चालणारी संस्कृती लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी रुजवली असल्याचे ते म्हणाले. यावेळी डॉ. जयश्रीताई थोरात, डॉक्टर संतोष खेडलेकर यांनी शुभेच्छा दिल्या. तर सुधाकर जोशी यांनी सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी संगमनेर डाक विभागाचे अमोल गवांदे यांच्या उपस्थितीमध्ये पोस्टाच्या तिकिटाच्या आवरण करण्यात आले यावेळी पांडुरंग घुले, बाबासाहेब ओहोळ, ॲड नानासाहेब शिंदे नवनाथ आरगडे, विष्णुपंत रहाटळ, जगन्नाथ घुगरकर, दशरथ वर्पे, सौ . वैशाली खेडलेकर यावेळी साहित्य शिक्षण समाजकारण व सहकार क्षेत्रातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे स्वागत विष्णुपंत  रहाटळ यांनी केले.प्रास्ताविक डॉ संतोष खेडलेकर यांनी केले तर अमेय जोशी यांनी आभार मानले. याप्रसंगी संगमनेर मधील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते

डॉ.राजेंद्र धामणे यांचे मानवतेचे मोठे कार्य

समाजातील मानसिक दृष्ट्या खचलेल्या महिला भगिनींचा महिला बहिणींचा सांभाळ करण्याचे मोठे काम डॉ राजेंद्र धामणे व सौ.सुचिता धामणे हे करत असून हे खरे मानवतेचे कार्य आहे. असे काम करणे अत्यंत सेवाभावी असून ही खरी परमेश्वराची सेवा होत असल्याची लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटले असेल या दांपत्याचे अभिनंदन केले आहे

डॉ संतोष खेडलेकर यांचे संगमनेरच्या सांस्कृतिक क्षेत्रात मोठे योगदान

संगमनेर चा इतिहास अत्यंत निरपेक्षपणे लिहिणारे संतोष खेडलेकर हे लेखक व साहित्यिक असून समाजाचे अभ्यासक आहेत. लोकनाट्य क्षेत्रातही त्यांनी मोठे संशोधन केले असून त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली आहे. संगमनेरच्या साहित्य क्षेत्रामध्ये त्यांचे योगदान कौतुकास्पद असल्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!