सह्याद्री सेवकांच्या पतसंस्थेची ५१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
सह्याद्री सेवकांच्या पतसंस्थेची ५१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
कोपरगांव । विनोद जवरे ।
सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक समाजाच्या सेवकांची सहकारी पतसंस्था मर्या. संगमनेर या संस्थेची 51वी वार्षिक सर्वसाधारण सभा के.बी.दादा हॉल बी.एस.टी कॉलेज संगमनेर येथे खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. वार्षिक सर्वसाधारण सभेस मा.आ.डॉ.सुधीरजी तांबे साहेब, चेअरमन सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक समाज संगमनेर मा.सौ.दुर्गाताई तांबे मा. नगराध्यक्षा संगमनेर नगरपरिषद संस्थेचे सहसेक्रेटरी मा.श्री.डी.जी.चासकर सर,संस्थेचे रजिस्ट्रार मा.श्री. बी.आर.गवांदे सर हे यावेळी उपस्थित होते, सभेच्या अध्यक्षस्थांनी संस्थेचे चेअरमन प्रा.श्री गणेश गुंजाळ सर हे होते.
मा.आ.तांबे साहेबांनी मार्गदर्शन करताना सह्याद्री सेवकांची पतसंस्था ही सेवकांची कामधेनू म्हणून गेली 51 वर्ष कार्य करत आहे संस्थेमुळे अनेक लोकांना आर्थिक मदत योग्य वेळेला उपलब्ध झालेली आहे आणि गेली अनेक वर्ष संस्थेचा दर्जा उत्तम असून आता संस्था सुवर्ण महोत्सव साजरा करत आहे याबद्दल सर्वांचे अभिनंदन करून , संस्थेच्या आर्थिक स्थितीबद्दल कौतुक केले व सेवानिवृत्त सभासदांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या. चेअरमन प्रा. गणेश गुंजाळ यांनी आपल्या प्रास्ताविकात आलेल्या सर्व सभासदांचे स्वागत करून संस्थेची आर्थिक स्थिती सभासदान समोर मांडली या आर्थिक वर्षात संस्थेला 1 कोटी 19 लाख 16 हजार 770 एवढा नफा झाला असून ऑडिट वर्ग अ प्राप्त झाला आहे ,संस्थेच्या ठेवी 30 कोटी 34 लाख असून संस्थेचे कर्ज वाटप 27 कोटी 24 लाख इतका आहे. संस्थेची कर्ज मर्यादा 5 लाख ते 50 लाख इतकी आहे. संस्थेची यशस्वी वाटचाल सभासदांसमोर मांडताना या आर्थिक वर्षात शेअर्सवर 12% डिव्हिडंट व कायम ठेवीवर 7% व्याज देण्याचे सर्वांना मते मंजूर करण्यात आले. कर्जावरील व्याजदर कमी करणे, संस्थेचे भागभांडवल वाढवणे, सभासदांना दिले जाणारा कन्यादान निधी योजनेच्या निधीत वाढ करणे अशा अनेक विषयांना सभासदांनी सर्वानुमते मंजुरी दिली. या वेळी संस्थेचे व्हा.चेअरमन श्रीमती अश्विनी दराडे संस्थेचे संचालक मा.श्री.शंकर शिंदे, मा.श्री.उमेश नेहे, मा.श्री.भाऊसाहेब शेटे, मा.श्री.एकनाथ घुगे, मा.श्री.राहुल सुर्वे, मा.श्री.राजीव साळवे, मा. श्रीमती.साळुंखे आशाताई, मा.श्री.बाळासाहेब कांडेकर ,मा.श्री.सखाराम खेमनर, मा.श्री.मधुकर कडलक, संस्थेचे सेक्रेटरी मा.श्री.नानासाहेब वाळुंज उपस्थित होते. सूत्रसंचालन श्री. बी.सी.कांडेकर सर यांनी केले व आभार श्री. एस.आर.शिंदे सर यांनी मानले.