ब्रेकिंग
प्रिय व्यक्तीच्या स्मृतिदिनाला उपस्थित राहणे वेदनादायी !
राजेश परजणे : वारीत मोफत सर्व रोग निदान शिबिरात 317 रुग्णांची तपासणी


प्रिय व्यक्तीच्या स्मृतिदिनाला उपस्थित राहणे वेदनादायी !

प्रिय व्यक्तीच्या स्मृतिदिनाला उपस्थित राहणे वेदनादायी !
राजेश परजणे : वारीत मोफत सर्व रोग निदान शिबिरात 317 रुग्णांची तपासणी
कोपरगाव । प्रतिनिधी । वारी येथील माझा प्रिय सहकारी राहुल टेके यास सामाजिक कार्यात समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन गरजवंत गोरगरिबांची सेवा करण्याची आवड होती. दुर्दैवाने नियतीच्या फेऱ्यात तो चार वर्षांपूर्वी आपल्यातून कायमचा निघून गेला. अशावेळी त्याचे समाजाप्रती असलेले दातृत्वरुपी सामाजिक कार्य आजही सुरू आहे. मात्र; या कार्यात तो नसून त्याच्या स्मृतिदिनाला मला उपस्थित राहावे लागते हे माझ्यासाठी अत्यंत वेदनादायी प्रसंग असल्याचे भावनिक उद्गार कोपरगाव येथील गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी काढले.

कोपरगाव तालुक्यातील वारी येथील दिवंगत ग्रामपंचायत सदस्य राहुल टेके यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणार्थ शुक्रवारी (दि. 30) वारी येथे राहुल दादा मधुकरराव टेके पाटील चॅरिटेबल ट्रस्ट, वारी, एस.जे.एस. हॉस्पिटल, कोकमठाण यांच्या संयुक्त विद्यमाने व प्राथमिक आरोग्य केंद्र, वारी यांच्या विशेष सहकार्याने मोफत सर्व रोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी परजणे बोलत होते. यावेळी 317 रुग्णांणी स्वतःची मोफत तपासणी करून लाभ घेतला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कोपरगाव पंचायत समितीचे माजी सभापती मच्छिंद्र टेके होते. कार्यक्रमाची सुरुवात राहुल टेके यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन करून झाली. अध्यक्षीय भाषणात मच्छिंद्र टेके यांनी ट्रस्टच्या गेल्या चार वर्षातील कार्याचा आढावा घेतला. या पुढील काळातही ट्रस्टच्या माध्यमातून गावात अशाच प्रकारे सामाजिक कार्याच्या कार्य सुरू राहावे. यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले. तसेच रामदास सोनवणे, डॉ. सायली ठोंमरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. दरम्यान पुढील तपासणी तसेच मोफत शस्त्रक्रिया करण्यासाठी 30 रुग्णांना हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले.

याप्रसंगी कोपरगाव पंचायत समिती चे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास घोलप, बाजार समिती संचालक प्रकाश गोर्डे, प्रथम लोक नियुक्त सरपंच सतीश कानडे, उपसरपंच विजय गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य दिलीप काकळे, अनिल गोरे, वाल्मीक जाधव, राजेंद्र टेके, संजय टेके, नानासाहेब टेके, दिलीप देशमुख, नरेंद्र ललवानी, मदन काबरा, पोपट गोर्डे, अशोक मलिक, स्मिता काबरा, निर्मला भारूड, प्रणाली देशमुख, योगेश झाल्टे, दौलत वायकर, दिनेश निकम, डॉ. मनोज वाकोडे, डॉ. ऋषिकेश रासने, डॉ. रोहित मीना, योगेश मोकळ, बंटी शेळके, अण्णा खवले, किरण काळे, ग्रामविकास अधिकारी दिलीप वारकर, गौतम डोसी, बाबासाहेब थोरमिसे, कुमार थोरमिसे, संजय थोरात, भाऊसाहेब टेके, पंडित वीर, राजेंद्र तिवारी, विजयसिंह गायकवाड, महेश वालझाडे, विजय काकळे यांच्यासह एस. जे. एस. हॉस्पिटलचे समन्वयक महेश रक्ताटे, हॉस्पिटलचे सर्व तज्ञ डॉक्टर्स, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ट्रस्टचे स्वयंसेवक तसेच राहुल दादा मित्र मंडळाचे सर्व सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक ट्रस्टचे अध्यक्ष पत्रकार रोहित टेके यांनी केले. तर माजी ग्रामपंचायत सदस्य गोरख टेके यांनी आभार मानले.