श्री आदिशक्ती मुंबादेवी प्रवेशद्वाराची कहार समाजाची मागणी पूर्ण – आ. आशुतोष काळे


श्री आदिशक्ती मुंबादेवी प्रवेशद्वाराची कहार समाजाची मागणी पूर्ण – आ. आशुतोष काळे
श्री आदिशक्ती मुंबादेवी प्रवेशद्वाराची कहार समाजाची मागणी पूर्ण – आ. आशुतोष काळे
कोपरगांव । प्रतिनिधी । कोपरगाव शहरात श्री आदिशक्ती मुंबादेवी प्रवेशद्वार व्हावे अशी कहार समाजाची मागील अनेक वर्षापासूनची मागणी होती. सर्व समाजाच्या नागरीकांना समाज मंदिर आणि सभागृहासाठी आवश्यक निधी दिला आहे. त्याप्रमाणे मागील अनेक वर्षापासूनची कहार समाजाची मागणी व त्यांच्या धार्मिक भावनांची दखल घेवून स्थानिक विकास निधीअंतर्गत श्री आदिशक्ती मुंबादेवी प्रवेशद्वाराची मागणी पूर्ण केली असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.
कोपरगाव शहरात आमदार स्थानिक विकास निधीअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या श्री आदिशक्ती मुंबादेवी प्रवेशद्वाराचे भूमिपूजन रविवार (दि.०१) रोजी आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, कोपरगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी विविध पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा माझा नेहमीच प्रयत्न राहिलेला आहे. कहार समाजाच्या मागणीस प्राधान्य देवून कोपरगाव शहरात उभारल्या जाणाऱ्या श्री मुंबादेवी प्रवेशद्वार कोपरगाव शहराच्या श्रद्धा व संस्कृतीचे प्रतीक ठरणार असून या श्री आदिशक्ती मुंबादेवी प्रवेशद्वारामुळे कोपरगाव शहराच्या वैभवात भर पडणार आहे. नागरीकांना अपेक्षित असलेले कोपरगाव मतदार संघाबरोबरच कोपरगाव शहरातील सर्व विकासकामे लवकरच पूर्ण होणार असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले.याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी,माजी नगरसेवक, कार्यकर्ते, व्यापारी व कहार समाज बांधव व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.