उद्योगविश्वात ग्रामीण विद्यार्थ्यांची दमदार एन्ट्री – डॉ. विठ्ठलराव विखे पाटील आयटीआयचे ४० प्रशिक्षणार्थी नामांकित कंपन्यांमध्ये निवड
प्लेसमेंट म्हणजेच प्रगती – डॉ. विखे पाटील आयटीआयचा विश्वास वाढवणारा टप्पा”

उद्योगविश्वात ग्रामीण विद्यार्थ्यांची दमदार एन्ट्री – डॉ. विठ्ठलराव विखे पाटील आयटीआयचे ४० प्रशिक्षणार्थी नामांकित कंपन्यांमध्ये निवड
उद्योगविश्वात ग्रामीण विद्यार्थ्यांची दमदार एन्ट्री – डॉ. विठ्ठलराव विखे पाटील आयटीआयचे ४० प्रशिक्षणार्थी नामांकित कंपन्यांमध्ये निवड
प्लेसमेंट म्हणजेच प्रगती – डॉ. विखे पाटील आयटीआयचा विश्वास वाढवणारा टप्पा”
आहिल्यानगर । प्रतिनिधी । ग्रामीण भागातील कौशल्याला योग्य व्यासपीठ मिळाल्यास युवकही उद्योगजगतात आपला ठसा उमटवू शकतात, याचे उत्तम उदाहरण म्हणजे डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशनच्या एमआयडीसी, अहिल्यानगर येथील इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (ITI) संस्थेतील विद्यार्थ्यांचे ताजे यश. संस्थेतील प्रशिक्षणार्थ्यांनी सलग दोन दिवस झालेल्या कॅंपस मुलाखतींमध्ये आपल्या उत्कृष्ट कौशल्याने औद्योगिक क्षेत्रात यशस्वी प्रवेश करत संस्थेच्या गुणवत्तेची उजळणी केली आहे. या दोन्ही मुलाखतींमध्ये एकूण ४० प्रशिक्षणार्थ्यांची यशस्वी निवड झाल्यामुळे विद्यार्थी, पालक व संस्था परिवारात आनंदाचे वातावरण आहे.
दि. ०३/०६/२०२५ रोजी एपिटोम कॉम्पोनंट्स प्रा. लि., सुपा एमआयडीसी या कंपनीसाठी फिटर, टर्नर, मशिनीस्ट, वायरमन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक व इलेक्ट्रिशियन या ट्रेडसाठी कॅंपस मुलाखत आयोजित करण्यात आली होती. यामध्ये एकूण ९५ प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते, ज्यामधून ७ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.दि. ०५/०६/२०२५ रोजी Exide Industries Ltd., MIDC, अहिल्यानगर या देशातील अग्रगण्य कंपनीसाठी फिटर, टर्नर, मशिनीस्ट, वेल्डर, मेकॅनिक डिझेल, एम.एम.व्ही. आणि इलेक्ट्रिशियन या ट्रेडमधून ११० प्रशिक्षणार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यामधून ३३ प्रशिक्षणार्थ्यांनी यश मिळवले.मुलाखतीपूर्वी संस्थेतर्फे आयोजित विशेष मार्गदर्शन सत्रांमध्ये सहभागी झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांनी सादरीकरण कौशल्य, तांत्रिक ज्ञान आणि संवादकौशल्य मोठ्या आत्मविश्वासाने सादर केले. संस्थेतील शिक्षक, प्लेसमेंट अधिकारी आणि प्रशिक्षण समन्वयकांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शनामुळे हे यश शक्य झाले. ही निवड संस्थेच्या प्रगत कार्यशाळा, अनुभवी मार्गदर्शक, डिजिटल शिक्षण प्रणाली तसेच ऑन-द-जॉब ट्रेनिंग या सर्वांगीण उपक्रमांचे फलित मानले जात आहे.संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुजय विखे पाटील यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत सांगितले, “ग्रामीण भागातील युवकांना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगारक्षम बनवणे हे आमचे ध्येय आहे, आणि हे यश त्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.”
याप्रसंगी जलसंपदा मंत्री व संस्थेचे चेअरमन मा. राधाकृष्ण विखे पाटील, डायरेक्टर जनरल डॉ. पी. एम. गायकवाड, डायरेक्टर (टेक्निकल) श्री. सुनील कोल्हापुरे, डायरेक्टर (मेडिकल) डॉ. अभिजीत दिवटे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. संस्थेचे प्राचार्य प्रा. ए. व्ही. सूर्यवंशी, उपप्राचार्य श्री. काकडे, गटनिदेशक श्री. पठारे, श्री. भुसे, व प्रशिक्षण व प्लेसमेंट अधिकारी श्री. अरुण म्हस्के यांनीही विद्यार्थ्यांचे तसेच संपूर्ण आयटीआय टीमचे मनःपूर्वक अभिनंदन केले.ही निवड डॉ. विठ्ठलराव विखे पाटील आयटीआयचे नाव गौरवाने उजळवणारी ठरली असून, भविष्यातील अनेक प्रशिक्षणार्थ्यांसाठी ती निश्चितच प्रेरणादायी ठरेल, याबाबत शंका नाही!