ब्रेकिंग

अहमदाबाद येथील घटनेच्‍या पार्श्‍वभूमीवर वाढदिवस साजरा करण्‍याचा निर्णय

अहमदाबाद येथील घटनेच्‍या पार्श्‍वभूमीवर वाढदिवस साजरा करण्‍याचा निर्णय

कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी कोणतेही कार्यक्रम आयोजित न करता समाजातील निराधार, गरजू, एकल महिला आणि शालेय विद्यार्थ्‍यांना मदत करण्‍याचे आवाहन

लोणी ।  प्रतिनिधी । जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्‍या आवाहानाला प्रतिसाद म्‍हणून त्‍यांच्‍या वाढदिवसाच्‍या निमित्‍ताने लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था आणि पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन यांच्‍या संयुक्त विद्यमाने रक्‍तदान दिनाचे औचित्‍य साधून, आयोजित करण्‍यात आलेल्‍या रक्‍तदान शिबीरात २५० रक्‍तदात्‍यांनी रक्‍तदान करुन, सामाजिक बांधिलकीचा वसा जोपासला.

अहमदबाद येथे विमान अपघाताच्‍या घडलेल्या दुर्दैवी घटनेच्‍या पार्श्‍वभूमीवर मंत्री विखे पाटील यांनी वाढदिवस साजरा न करण्‍याचा निर्णय जाहीर करुन, कोणतेही सार्वजनिक आणि सत्‍कार सोहळे आयोजित न करता सामाजिक उपक्रम राबवावेत असे आवाहन केले होते. त्‍यानुसार प्रवरा परिवरातील संस्‍थानी एकत्रित येवून रक्‍तदान दिनाच्‍या दिवशी भव्‍य रक्‍तदान शिबीर कन्‍या विद्या मंदिर येथे आयोजित केले होते. या रक्‍तदान शिबीराचे औपचारिक उद्घाटन डॉ.सुजय विखे पाटील, जिल्‍हा परिषदेच्‍या माजी अध्‍यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्‍थेच्‍या मुख्‍य कार्यकारी डॉ.सुष्‍मीता विखे पाटील यांच्‍या उपस्थितीत करण्‍यात आले. या रक्‍तदान शिबीरामध्‍ये २५० रक्‍तदात्‍यांनी उत्‍स्‍फुर्तपणे सहभाग नोंदवून सामाजिक दायित्‍व जोपासले आहे. या बरोबरीनेच ३५० व्यक्तींची आरोग्य तपासणी करण्यात आली. याप्रसंगी संस्थेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.शिवानंद हिरेमठ, शिक्षण संचालक डॉ.प्रदीप दिघे, शिक्षण संचालिका सौ.लीलावती सरोदे, डॉ.किरण आहेर उपस्थित होते. या उपक्रमा विषयी माहीती देताना डॉ.सुस्मिता विखे पाटील म्हणाल्या की, मंत्री विखे पाटील यांनी केलेल्‍या आवाहानाला पाठबळ म्‍हणून रक्‍तदान शिबीर, वृक्षारोपण आणि आरोग्‍य शिबीराचे आयोजन संस्‍था पातळीवर करण्‍यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वृक्ष संवर्धनाच्‍या चळवळीला पुढे घेवून जाण्‍यासाठी ‘एक पेड मॉ के नाम’ हा उपक्रम राबविण्‍याच्‍या केलेल्‍या आवाहानाला पाठबळ म्‍हणून मंत्री विखे पाटील यांनी सर्व गावे, वाड्या वस्‍त्‍यांमध्‍ये हा उपक्रम राबविण्‍याचे सुचित केले होते. लोणी बुद्रूक गावामध्‍ये उपक्रमाचा प्रारंभ मंत्री विखे पाटील यांच्‍या उपस्थितीत करण्‍यात आला. माजी मंत्री आण्‍णासाहेब म्‍हस्‍के पाटील, जिल्‍हा परिषदेच्‍या माजी अध्‍यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील यांच्‍यासह ग्रामस्‍थ मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या सर्व शाखांमध्ये एक पेड माँ के नाम उपक्रम राबविण्यात आला.प्रारंभी मंत्री विखे पाटील यांनी लोणी बुद्रूक गावचे ग्रामदैवत श्री.म्‍हसोबा महराजा यांना महाअभिषेक करुन दर्शन घेतले. ग्रामस्‍थांच्‍या सहयोगातून श्री.म्‍हसोबा महाराजांना तयार करण्‍यात आलेले सुवर्ण अलंकारही अर्पण करण्‍यात आले.

अहमदाबाद येथील घटनेच्‍या पार्श्‍वभूमीवर वाढदिवस साजरा करण्‍याचा निर्णय आपण घेतला आहे. कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी कोणतेही कार्यक्रम आयोजित न करता समाजातील निराधार, गरजू, एकल महिला आणि शालेय विद्यार्थ्‍यांना मदत करण्‍याचे आवाहन आपण केले असल्‍याचे मंत्री विखे पाटील यांनी माध्‍यमांशी बोलताना सांगितले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!