ब्रेकिंग
नामदेवराव परजणे पाटील यांच्या पुण्यस्मरणानिमित्त संवत्सरला प्रवचन व व्याख्यानांचे आयोजन

नामदेवराव परजणे पाटील यांच्या पुण्यस्मरणानिमित्त संवत्सरला प्रवचन व व्याख्यानांचे आयोजन

नामदेवराव परजणे पाटील यांच्या पुण्यस्मरणानिमित्त संवत्सरला प्रवचन व व्याख्यानांचे आयोजन
कोपरगांव । प्रतिनिधी । गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघाचे संस्थापक दिवंगत नेते नामदेवराव परजणे पाटील (आण्णा) यांच्या २१ व्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त कोपरगांव तालुक्यातील संवत्सर येथे दि. १८, १९ व २० जून २०२५ असे तीन दिवस नामवंत व्याख्यात्यांच्या प्रवचनाचे व व्याख्यांनांचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमांचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील यांनी केले.

संवत्सर येथील नामदेवराव परजणे पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय पुण्यस्मरण सोहळ्यात बुधवार दि. १८ जून रोजी चाळीसगांव येथील ज्येष्ठ किर्तनकार ह. भ. प. विश्वनाथ महाराज वाडेकर यांचे दुपारी २ वाजता ” योग, उद्योग व देव ” या विषयावर प्रवचन, गुरुवार दि. १९ जून रोजी श्रीरामपूर येथील ज्येष्ठ विनोदी व्याख्याते प्रा. हंबीरराव नाईक सर यांचे दुपारी २ वाजता ” हसण्यासाठी जीवन आपुले ” या विषयावर तर शुक्रवार दि. २० जून रोजी पुणे येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह वि. दा. पिंगळे सर यांचे दुपारी २ वाजता ” संत परंपरा व सामाजिक प्रबोधन ” या विषयावर व्याख्याने होणार आहेत. तीन दिवस चालणाऱ्या या कार्यकमांचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन संवत्सर ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आलेले आहे.