पोहेगाव नागरी पतसंस्थेच्या कार्यक्षेत्र वाढीला आयुक्तांची मंजुरी – नितीनराव औताडे
नाशिक व पुणे विभागीय भौगोलिक कार्यक्षेत्रात वाढ

पोहेगाव नागरी पतसंस्थेच्या कार्यक्षेत्र वाढीला आयुक्तांची मंजुरी – नितीनराव औताडे
पोहेगाव नागरी पतसंस्थेच्या कार्यक्षेत्र वाढीला आयुक्तांची मंजुरी – नितीनराव औताडे
नाशिक व पुणे विभागीय भौगोलिक कार्यक्षेत्रात वाढ
कोपरगाव । प्रतिनिधी । अहिल्यानगर जिल्ह्यातील पतसंस्था चळवळीतील अग्रगण्य संस्था म्हणून ओळख असलेल्या पोहेगाव नागरी सहकारी पतसंस्थेचे आता दोन विभागात कार्यक्षेत्र वाढले आहे. पुणे व नाशिक विभागीय भौगोलिक कार्यक्षेत्र वाढीची मंजुरी महाराष्ट्र सहकारी संस्थेच्या अधिनियम १९६० चे कलम १३(२) अन्वये

प्रदान केलेल्या अधिकारानुसार
महाराष्ट्र राज्य सहकारी संस्थेचे अप्पर निबंधक श्रीकृष्ण वाडेकर यांनी दिली आहे अशी माहिती संस्थेचे संस्थापक नितीनराव औताडे यांनी दिली. शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे यांनी २० /९ /१९९० रोजी या सहकारी पतसंस्थेची स्थापना केली होती. ग्रामीण भागात सुरू केलेली ही पतसंस्था पारदर्शक व्यवहार व विश्वासाच्या जोरावर ठेवीदार व कर्जदार यांच्या गळ्यातील ताईत बनली.सातत्याने या पतसंस्थेला ऑडिट वर्ग अ मिळत राहिला. यामुळे संस्था परिसराच्या विश्वासात पात्र ठरली. ग्रामीण भागातून सुरू झालेल्या या पतसंस्थेने पुढे शिर्डी व कोपरगाव शहरातही शाखा सुरू केल्या. आज संस्थेकडे १७९ कोटी १४ लाख ३१ हजार ३२७ रुपयांच्या ठेवी आहेत. संस्थेने ११४ कोटी ७७ लाख २३हजार २०१ रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. संस्था लवकरात २०० कोटींच्या ठेवीचा टप्पा ओलांडणार असल्याचे संस्थेचे संस्थापक नितीनराव औताडे यांनी सांगितले.पोहेगाव व कोपरगाव येथे संस्थेच्या सुसज्ज इमारती असून संस्था विविध सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेत असते. संस्थेची झपाट्याने प्रगती होत असताना जिल्ह्यापुरतं कार्यक्षेत्र संस्थेच्या वाढीसाठी अपुरे असल्याची बाब संस्थेच्या संचालक मंडळाला बसू देत नव्हती. संस्थेच्या प्रगतीसाठी , वाढीसाठी, पतसंस्थेच्या विस्तारासाठी कार्यक्षेत्र वाढ करणे आवश्यक होते. त्यासाठी संचालक मंडळांनी दोन वर्षापासून पाठपुरावा केला होता.वार्षिक सर्वसाधारण सभेत ठराव संमत करून आयुक्तांकडे पाठवला होता. अटी व शर्तीची सर्व पूर्तता होत असल्याने व संस्था सातत्याने एडिट अ वर्गात असल्याने नाशिक व पुणे या दोन विभागात संस्थेच्या कार्यक्षेत्र वाढीची मंजुरी आयुक्तांनी दिली आहे. यामुळे आता संस्थेचा कारभार पुणे, सोलापूर, कोल्हापूर ,सांगली, सातारा, नाशिक, जळगाव, नंदुरबार ,धुळे व अहिल्यानगर या दहा जिल्ह्यात वाढणार आहे.नाशिक व पुणे विभागीय कार्यक्षेत्राची वाढ मिळाल्याने पोहेगाव नागरी पतसंस्थेच्या सभासदांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या निर्णयामुळे संस्थेचे संस्थापक नितीनराव औताडे, अध्यक्ष दादासाहेब औताडे, उपाध्यक्ष विलास रत्न, संचालक मंडळ यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.