कृषी दिनानिमित्त कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केले वृक्षारोपण


कृषी दिनानिमित्त कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केले वृक्षारोपण
कृषी दिनानिमित्त कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केले वृक्षारोपण
संगमनेर । प्रतिनिधी । १ जुलै रोजी चंदनापुरी येथे कृषी दिनाच्या औचित्य साधून उत्साहात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय , गुंजाळवाडी पठार, संगमनेर येथील चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले . कार्यक्रमांमध्ये चंदनापुरी गावचे आदर्श सरपंच श्री भाऊराव रहाणे , ग्रामविकास अधिकारी रामदास काळे व सर्व विद्यमान सदस्य आणि कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रोहित उंबरकर व सर्व शिक्षक वृंदांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाच्या चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांनी कृषी दिन साजरा केला. उपस्थित विद्यार्थी सुमित सैंदर, गणेश थेटे ,वेदांत चेन्ने ,पृथ्वीराज पवार, ओमकार गाडेकर ,गौरव कर्चे, करण फुंदे, जाधव कुणाल ,महेश निकट, पुष्कर वाजे, ओमकार कोकाटे, किरण चोपडे, मनीष भुजबळ, सौरभ गाडेकर ,ओम गाडेकर, संदेश घागरे, वैभव शेळके, उमेश चोबे, स्वाती लांगी, प्रथमेश भुसारी हे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष आदर्श सरपंच भाऊराव रहाणे यांनी वृक्षारोपणाचे महत्त्व विशद केले *झाडे लावा झाडे जगवा* चा संदेश देत त्यांनी सर्वांना जास्तीत जास्त झाडे लावण्याचा आवाहन केले तसेच पर्यावरणाच्या संवर्धनासाठी वृक्षारोपण किती आवश्यक आहे याबद्दल मार्गदर्शन केले यानंतर उपस्थित सर्व विद्यार्थी व ग्रामस्थांनी चंदनापुरी गावच्या प्राथमिक आरोग्य केंद्र मध्ये विविध प्रकारची झाडे लावले विद्यार्थ्यांनी आंबा ,सिताफळ, चिंच, खजूर, वड, पिंपळ, जांभूळ ,लिंब ,करंजी, रामफळ, चिकू, असे विद्यार्थ्यांनी 101 वृक्षरोपण करून कृषी दिन साजरा केला. विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात उत्साहाने भाग घेतला आणि झाडाचे निगा राखण्याची शपथ घेतली यावेळी ग्रामविकास अधिकारी रामदास काळे यांनी सांगितले की वृक्ष आपल्याला फळे , फुले आणि थंड हवा देतात तसेच ते पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत करतात.
वृक्षरोपण झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी चंदनापुरी गावामधून वृक्षदिंडी काढण्यात आली त्यामध्ये गावात संदेश देण्यात आला *झाडे लावा झाडे जगवा*, *पर्यावरण वाचवा* , *पर्यावरणाचे रक्षण करा*. कृषी दिनानिमित्त कृषी दुतांनी शेतकऱ्यांना व ग्रामस्थांना आवाहन केले की त्यांनी आपल्या शेतात आणि परिसरात अधिका अधिक झाडे लावावेत आणि त्यांचे संगोपन करावे त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल अशी माहिती त्यांनी सांगितली, वृक्षारोपण कार्यक्रमामुळे गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले ग्रामस्थांनी या उपक्रमाचे कौतुक केले व भविष्यात असे कार्यक्रम आयोजित करण्याचे आवाहन केले. शेवटी गावचे आदर्श सरपंच माननीय श्री भाऊराव रहाणे यांनी कृषी व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य व सर्व शिक्षकांचे आणि सर्व विद्यार्थ्यांचे आभार व्यक्त केले. अशाप्रकारे कृषी दुतांनी कृषी दिनानिमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम उत्साहात साजरा केला.