मा. कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या सूचनेनंतर प्रशासनाकडून शेतकऱ्यांसाठी युरिया उपलब्ध

मा. कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या सूचनेनंतर प्रशासनाकडून शेतकऱ्यांसाठी युरिया उपलब्ध

मा. कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या सूचनेनंतर प्रशासनाकडून शेतकऱ्यांसाठी युरिया उपलब्ध
महाराष्ट्राचे सर्वात यशस्वी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात
महाराष्ट्राचे सर्वात यशस्वी कृषिमंत्री म्हणून बाळासाहेब थोरात यांनी गौरवास्पद कामगिरी केली असून सहा वर्ष राज्याचे कृषिमंत्री पद भूषवताना या कार्यकाळात सर्वाधिक कृषी उत्पन्न झाले याचबरोबर शेतकऱ्यांसाठी महापिक अभियान, 1 लाख शेततळी, विद्यापीठे बांधावर असे अनेक सातत्याने उपक्रम राबवले असून कृषी खात्यामध्ये त्यांनी केलेल्या ऐतिहासिक कामामुळे महाराष्ट्रभर लोकप्रिय कृषी मंत्री म्हणून त्यांच्या कार्यकाळाची नोंद आहे. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळामध्ये शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंतची विन अट कर्जमाफी देण्यासाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा सर्वाधिक पुढाकार राहिला असल्याचे प्रगतशील शेतकरी रमेश गुंजाळ,( खांडगाव) यांनी म्हटले आहे

माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रशासनाला व सरकारला राज्यातील शेतकऱ्यांना व संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना बफर स्टॉक मधून 50% युरिया उपलब्ध करून देण्यासाठी पत्र दिले होते. या मागणीचा विचार करून कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना 50 टक्के युरिया उपलब्ध करून देण्यात आली आहे.माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नामुळे शेतकऱ्यांना युरिया उपलब्ध होणार असल्याने शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.