महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे – काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची राज्य सरकारवर टीका
महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे – काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची राज्य सरकारवर टीका
संगमनेर । प्रतिनिधी । महायुतीने विधानसभा निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणीसाठी 2100 रुपये देण्याची घोषणा केली. त्यांना काही दिले नाही. कर्जमाफी बाबत शेतकऱ्यांना फसवले. आमदारांच्या मारामाऱ्या सुरू आहेत.मंत्र्यांनी कसे वागावे हे सांगण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. अनेक मंत्री पैशांचे घोटाळे करत आहेत. मोठा भ्रष्टाचार झाला आहे. मुख्यमंत्री त्यांच्यावर पांघरून घालत आहेत. अशी राज्याची दयनीय परिस्थिती असून महायुती ही सत्तेसाठी एकत्र आली असून महायुती सरकारमुळे महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे सुरू असल्याची टीका काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा मा.महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्य सरकारवर केली आहे.
महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे – काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची राज्य सरकारवर टीका
शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी व लाडक्या बहिणीला 2100 रुपये देण्याची घोषणा केली होती. शेतकरी व महिलांना त्यांनी फसवले आहे. पैसे नाही तर 57 हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या कशा मान्य केल्या असा सवाल विचारताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सत्ताधारी आमदारांना निधी देणार आहे.हा दुजाभाव होत आहे. मंत्री बेताल वक्तव्य करत आहेत. आमदार ही अस्वस्थ आहेत. नगर विकास विभागाचा निधी मुख्यमंत्री ठरवणार आहे. मंत्रिमंडळात अविश्वासाचे वातावरण आहे. एका म्यानामध्ये तीन तलवारी राहणार कशा असा सवाल विचारताना आगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबत महाविकास आघाडीची बैठक होऊन राज ठाकरे यांच्या समावेशाबाबत निर्णय होईल असेही ते म्हणाले.



