ब्रेकिंग

राज्यात भरपूर पाऊस पडू दे – मा. आ.डॉ.तांबे यांची खांडेश्वराकडे प्रार्थना

राज्यात भरपूर पाऊस पडू दे – मा. आ.डॉ.तांबे यांची खांडेश्वराकडे प्रार्थना

राज्यात भरपूर पाऊस पडू दे – मा. आ.डॉ.तांबे यांची खांडेश्वराकडे प्रार्थना

संगमनेर । प्रतिनिधी । सध्या श्रावण महिना सुरू असून सर्वत्र भक्तिमय वातावरण आहे. तालुक्यासह राज्यात अनेक ठिकाणी चांगला पाऊस झाला असून सर्वत्र पिके चांगली आहे.  शेती हा अर्थव्यवस्थेचा कणा असून तो भक्कम ठेवण्यासाठी राज्यात भरपूर पाऊस पडू दे अशी प्रार्थना मा आ. डॉ. सुधीर तांबे यांनी खांडेश्वराकडे केली आहे.

आज तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त खांडगाव येथील खांडेश्वर महादेवाची मा. आ.डॉ. सुधीर तांबे यांनी विधिवत पूजा करून अभिषेक केला. यावेळी संगमनेर नगरपालिकेच्या मा. नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, डॉ. जयश्रीताई थोरात, डॉ. नामदेव गुंजाळ, रमेश गुंजाळ, एड मधुकर गुंजाळ, विठ्ठल गुंजाळ, लक्ष्मण गुंजाळ ,संजय गुंजाळ, डॉ.  विजय पवार यांसह भाविक उपस्थित होते. यावेळी मा आ डॉ. तांबे म्हणाले की, सध्या श्रावण महिना सुरू असून सर्वत्र भक्तिमय वातावरण आहे. यावर्षी समाधानकारक पाऊस झाला असून पिके चांगली आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांसह सर्वजण आनंदी आहे. शेती हा अर्थव्यवस्थेचा कणा असून शेती चांगली फुलली तर सर्वत्र बाजारपेठा फुलतात. त्यामुळे शेतीसह सर्व उद्योग व्यवसायांना चांगले दिवस येण्यासाठी राज्यात सर्वत्र चांगला पाऊस होणे गरजेचे आहे. तो व्हावा अशी खांडेश्वर चरणी प्रार्थना आहे. त्याचबरोबर सर्व भाविक भक्तांना मनःपूर्वक शुभेच्छा

यावेळी एकविरा फाउंडेशन, एस. एम. बी. टी रुग्णालय, जागृत देवस्थान श्री. क्षेत्र खांडेश्वर महादेव ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. तसेच  संगमनेर येथील आधार रक्तपेढी यांच्या वतीने आयोजित भव्य रक्तदान शिबिर, धांदरफळ खुर्द येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व निमज येथील आयुष्यमान आरोग्य मंदिर यांच्या वतीने आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले होते. यावेळी मा. आ.डॉ. सुधीर तांबे यांचा मंदिर प्रशासन ट्रस्ट व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. 

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!