ब्रेकिंग

डॉ देवेंद्र ओहरा मतिमंद विद्यालयास भरीव मदत

डॉ देवेंद्र ओहरा मतिमंद विद्यालयास भरीव मदत

हिसोव्हा इलेक्ट्रॉनिक, विवो मोबाईल व पुण्यातील उर्मी संस्थेची सामाजिक बांधिलकी
संगमनेर  । प्रतिनिधी । विवो मोबाईल व हिसोव्हा इलेक्ट्रॉनिक यांच्या सीएसआर फंडातूनसंगमनेर संग्राम संस्थेच्या डॉ. देवेंद्र निवासी मतिमंद विद्यालयास शनिवार (दि 23) रोजी विविध वस्तू वाटप कार्यक्रम शाळेत संपन्न झाला.  

संस्थेचे सचिव डॉ. नामदेव गुंजाळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या सदर कार्यक्रमास विवोच्या सीएसआर फंडातून वसतिगृहासाठी किराणा व धान्य तसेच एक सिंथेसायझर, एक तबला, एक ढोलकी, एक हार्मोनियम आणि झांजरी इ. संगीत साहित्याचे वाटप विवोचे एच आर मॅनेजर सोम्या बक्षी, फायनान्स मॅनेजर शिवकांत चव्हाण, ब्रांच मॅनेजर प्रमोद वाघ तसेच संगमनेरचे डिस्ट्रीब्यूटर वैभव शाह यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.विद्यालयाचे मुख्याध्यापक चांगदेव खेमनर यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत व कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तर संस्थेचे सचिव डॉ. नामदेव गुंजाळ यांनी सर्व पाहुण्यांचा शाल व बुके देऊन सन्मान केला. याप्रसंगी विवोचे असिस्टंट मॅनेजर सन्माननीय रोहित वाकडे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, आमचा सीएसआर फंड योग्य व गरजवंत व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही उर्मी पुणे या सेवाभावी संस्थेची मदत घेत असतो. आणि उर्मीचे किशोर पेडणेकर यांनी अतिशय योग्य संस्थेची निवड केल्यामुळे आम्हास निश्चितपणे खूप आनंद व समाधान वाटत आहे.डॉ सुधीरजी तांबे आणि विश्वस्त आमदार सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या मूकबधिर व मतिमंद मुलांच्या शिक्षण प्रशिक्षण व पुनर्वसनाच्या कार्याने आम्ही खूप भारावून गेलो आहोत. याप्रसंगी विवोचे फायनान्स मॅनेजर शिवकांत चव्हाण संगमनेरचे विवोचे डिस्ट्रीब्यूटर वैभव शाह आणि संगमनेरचे उर्मी संस्थेचे राहुल शेंडे व  विलास मोहोळ यांचे आभार मानण्यात मानले. विवो टीम लीडर मनोज सहाने यांनी मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी एरिया सेल्स मॅनेजर अर्पण पराते, डिस्ट्रीब्यूशन मॅनेजर उमेश रावळ मोबाईल रिटेल असोसिएशनचे संगमनेर अध्यक्ष निलेश कोळपकर साजिब शेख, दत्ता हसे, अमोल आगलावे, दीपक मंडलिक, पंकज जनवेजा, तुषार सर तसेच संग्राम मूकबधिर व मतिमंद विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. संग्राम मूकबधिर विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील कवडे यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले तर भाऊसाहेब नरवडे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!