ब्रेकिंग

नदीपात्रात वाहून गेलेल्या तरुणाच्या शोधासाठी आ.सत्यजित तांबे यांचा पुढाकार

नदीपात्रात वाहून गेलेल्या तरुणाच्या शोधासाठी आ.सत्यजित तांबे यांचा पुढाकार

तातडीने प्रभावी शोध मोहीम राबवा – आमदार सत्यजित तांबे
संगमनेर । प्रतिनिधी । मंगळवारी रात्री कचरा टाकण्यासाठी गेलेल्या रंगारगल्ली येथील विजय संभाजी कुटे यांचा तोल जाऊन ते नदी पाण्यात वाहून गेले. ही बातमी समजतात आमदार सत्यजित तांबे यांनी तातडीने घटनास्थळाला भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन करत कुटे यांच्या शोधासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना राबवा अशा सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.

गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर रंगार गल्ली येथील राहणारे विजय संभाजी कुटे (वय 40) हे आपल्या स्कुटी वरून कचरा टाकण्यासाठी प्रवारा नदीच्या कडेला गेले. गाडी कडेला लावताना त्यांचा तोल जाऊन ते पाण्यामध्ये पडले. आणि नदीच्या पुराच्या पाण्यात ते वाहून गेले त्यांचा अद्याप शोध लागला नसल्याने संगमनेर मध्ये मोठे चिंतेचे वातावरण असून घटनांची बातमी कळताच आमदार सत्यजित तांबे यांनी घटनास्थळाला भेट देऊन तातडीने प्रभावी उपाय योजना राबवा अशा सूचना केल्या याचबरोबर काही पथक अहमदनगर आणि पुण्यावरून मागवा अशा सूचनाही यावेळी आमदार सत्यजित तांबे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. यावेळी पोलिस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांच्यासह विविध शासकीय अधिकारी उपस्थित होते.

विजय कुटे हे सामाजिक कार्यकर्ते होते. मंगळवारी रात्री घटना घडल्यानंतर अद्याप त्यांचा शोध न लागल्याने संगमनेर मध्ये चिंतेचे वातावरण असून तातडीने विविध शोध पथके मागून त्यांचा शोध घ्या अशा सूचना आमदार सत्यजित तांबे यांनी प्रशासनाला दिले आहे. याचबरोबर माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही विजय यांचे वडील संभाजी कुटे यांचे सांत्वन केले असून प्रशासनाने तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात अशा सूचना त्यांनी केल्या आहेत. याचबरोबर नदीला जास्त पाणी आल्याने तरुणांनी व नागरिकांनी अधिक सतर्क राहावे असे आवाहनही मा.मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले असून आपल्या यशोधन कार्यालयामार्फतही नागरिकांना विविध सुविधा देण्यात यावा अशा सूचना केल्या आहेत. यावेळी संगमनेर मधील विविध गणपती मंडळाचे पदाधिकारी व युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!