ब्रेकिंग

शहापूर येथे बिबट्याच्या हल्ल्यात कालवड फस्त; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

सावधान..! शहापुर भागात बिबट्याचा वावर

शहापूर येथे बिबट्याच्या हल्ल्यात कालवड फस्त; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
सावधान..! शहापुर भागात बिबट्याचा वावर
कोपरगांव । विनोद जवरे । कोपरगांव तालुक्यातील शहापुर येथील शेतकरी भाऊसाहेब रामराव पाचोरे यांचा वस्तीत बुधवारी बिबट्याने कालवड  फस्त केली. यामुळे भाऊसाहेब पाचोरे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. गेली अनेक दिवसांपासून बिबट्या पाळीव जनावरांवर हल्ले करत असल्याने पशुपालक भयभीत झाले आहेत. थोडीफार शेती व पशुपालन या व्यवसायातून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतो. त्यातच बिबट्या एक एक करून पशुधनावर हल्ले करत राहिला तर शेवटी आम्ही करायचे काय? हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.
दरम्यान, हल्ला झालेल्या कालवडचा  वनविभागाने पंचनामा केला आहे. पुढील कार्यवाही सुरू असल्याचे वनरक्षक पगारे मँडम यांनी सांगितले. याप्रसंगी सरपंच योगिता डांगे ,पोलीस पाटील दामोदर खंडीझोड  उपस्थित होते. तालुक्यात मोठया प्रमाणात अनेक ठिकाणी बिबट्याचा वावर वाढत असून लोकवस्तीत देखील बिबट्याने प्रवेश केला आहे त्यामुळे नागरिकांनी व शेतकरी बांधवांनी आपल्या घरातील मुलांची जनावरांची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!