ब्रेकिंग

गंगागिरी महाराजाच्या १७७ व्या अखंड हरिनाम सप्ताहास  मोठ्या उत्साहात प्रारंभ

दोन लाख भावीकासह उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची उपस्थिती

गंगागिरी महाराजाच्या १७७ व्या अखंड हरिनाम सप्ताहास  मोठ्या उत्साहात प्रारंभ

दोन लाख भावीकासह उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची उपस्थिती तर मांडे पुरणपोळी मसाले भाताची पंगत

कोपरगाव । विनोद जवरे ।

गंगागिरी सरला बेटाच्या वतीने गंगागिरी महाराज यांचा अखंड हरिनाम 177 वा अखंड हरिनाम सप्ताहास पंचाळे येथे मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला.यावेळी गोदावरी धाम सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज हे गंगागिरी महाराजांच्या पादुका घेऊन हेलिकॉप्टरने बेटावरून पंचाळे येथे आले. यावेळी त्यांच्यावर हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करण्यात आली त्यावेळी सप्ताह नियोजन समितीचे अध्यक्ष संभाजी जाधव उपाध्यक्ष राजेश गडाख विठ्ठल राजे उगले हरिभक्त परायण शिवाजी महाराज तळेकर मधुकर महाराज अरुण थोरात कैलास थोरात यांनी महाराजांचे स्वागत केले. यावेळी पंचाळे रस्त्यापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या प्रवेशद्वारापासून रामगिरी महाराजांची रथारूढ ढोल ताशांच्या गजरात सवाद्य मिरवणूक काढण्यात आली .या मिरवणुकीत रथ घोडे आदिवासी नृत्य बँड पथक शहा देवपूर पंचाळे शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते . ही मिरवणूक एक किलोमीटर होती. एक किलोमीटर अंतर होईल इतके भाविक या मिरवणुकीत सहभागी झाले होते . लाखो भाविक या मिरवणुकी सहभागी झाले होते. मिरवणूक गावातून काढण्यात आली पुन्हा पंचाळे शहा रस्त्याने स्थळाच्या प्रवेशद्वारा जवळ येऊन महाराजांचे भजन मंडपात आगमन झाले .त्यावेळी भजन मंडपामध्ये असलेल्या देवादिकांच्या प्रतिमेचे रामगिरी महाराजांनी दर्शन घेतले . त्यावेळी त्यांचे हजारो भाविकांसमोर भजन मंडपामध्ये प्रवचन झाले

यावेळी त्यांनी प्रवचनात पांचाळेकरांनी सप्ताहाची सातत्याने मागणी केली सतत बारा वर्षे मागणी केल्यानंतर पंचाळे करांना तपपुरतीनंतर या सप्ताहाची सेवा करण्याचा योग आला. यावेळी खासदार राजाभाऊ वाजे आमदार माणिकराव कोकाटे कोपरगावचे आमदार आशुतोष काळे संगमनेरचे आमदार बाळासाहेब थोरात यांनी या सप्ताहासाठी अमूल्य असे योगदान दिले व योग्य असे नियोजन केल्यामुळे हा सप्ताह यशस्वी झाला या सप्ताहाबद्दल त्यांनी संयोजकांना शाब्बासकीची थाप दिली अन्नदान भजन प्रवचन या माध्यमातून भाविकांमध्ये शांततेचा संदेश देण्याचा हेतू या सप्ताहामध्ये असल्याचे त्यांनी प्रवचना सांगितले यावेळी या कोपरगावचे आमदार आशुतोष काळे, मधुकर महाराज, हरिभक्त रामकृष्ण महाराज लहवितकर, शिवाजी महाराज तळेकर, राष्ट्रवादी चे नगर जिल्हाध्यक्ष कपिल पवार तालुकाध्यक्ष चारुदत्त सिंनगर हरिभक्त परायण कावेरीताई घुमरे, सागर महाराज घुमरे, बाळासाहेब कांदळकर, राहुल महाराज डुंबरे, हरी महाराज गवळी हे उपस्थित होते यावेळी सप्ताह कमिटीचे अध्यक्ष संभाजी जाधव अरुण थोरात कैलास थोरात गणेश थोरात यांनी महाप्रसाद पंक्तीचे नियोजन केले या पहिल्याच दिवशी दोन ते अडीच लाख भावीक उपस्थित होते या सर्व भाविकांना आज पहिल्या दिवशी मांडे पुरणपोळी मसाले भाताचा प्रसाद देण्यात आला. दुधाचे टँकर मध्ये भरलेले दूध भाविकांना पुरवले जात होते ट्रॅक्टरमध्ये मांडे ठेवून ते स्वयंसेवकांच्या माध्यमातून पंगतीमध्ये वाढले जात होते जात होते अत्यंत भक्तिमय वातावरणामध्ये सप्ताहाची पहिल्या दिवसाची सुरुवात झाली

यावेळी भजन मंडपामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रफुल्ल पटेल, रूपाली चाकणकर, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे, कोपरगावचे आमदार आशुतोष काळे ,आमदार सरोज ताई अहिरे यांनी सप्ताह स्थळभेट दिली यावेळी सप्ताह समितीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!