थोरात कारखान्याकडून दिवाळीनिमित्त शेतकऱ्यांना 200 रुपये तर कामगारांना 20% बोनस व 30 दिवसांचे सानुग्रह अनुदान
शेतकरी व कामगारांची दिवाळी गोड होणार
थोरात कारखान्याकडून दिवाळीनिमित्त शेतकऱ्यांना 200 रुपये तर कामगारांना 20% बोनस व 30 दिवसांचे सानुग्रह अनुदान

शेतकरी व कामगारांची दिवाळी गोड होणार
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभामध्ये त्यांनी ही घोषणा केली. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार डॉ.सुधीर तांबे, ॲड. माधवराव कानवडे, सौ.कांचनताई थोरात, सौ.दुर्गाताई तांबे, बाबासाहेब ओहोळ, व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले, लक्ष्मणराव कुटे,संपतराव डोंगरे, शंकरराव खेमनर, संचालक संतोष हासे, संपतराव गोडगे, इंद्रजीत भाऊ थोरात, इंद्रजीत खेमनर, डॉ.तुषार दिघे, विनोद हासे, सतीश वर्पे, रामदास धुळगंड, विलास शिंदे, रामनाथ कुटे, नवनाथ आरगडे, विजय राहणे,गुलाबराव देशमुख, अरुण वाकचौरे, योगेश भालेराव, अंकुश ताजणे, दिलीप नागरे,सौ.लताताई गायकर, सौ.सुंदरबाई दुबे,बंडू नाना भाबड, मदन आंबरे,कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर,सेक्रेटरी किरण कानवडे आणि उपस्थित होते.यावेळी बोलताना माजीमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, कारखान्याने कायम सभासद शेतकरी व कामगारांचे हित जोपासत गौरवास्पद वाटचाल केली आहे. यावर्षी दिवाळीनिमित्त सन 2024 – 25 या गणित हंगामात गाळपास आलेल्या उसास कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांना 200 रुपये प्रति टन व कार्यक्षेत्राबाहेरील ऊस उत्पादकांना 100 रुपये प्रति टन अनुदान दिले जाणार आहे. त्यामुळे कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांना 3200 प्रति टन भाव मिळणार आहे.
यामुळे सभासद शेतकरी व ऊस उत्पादकांची दिवाळी गोड होणार असून दरवर्षीप्रमाणे कारखान्याकडून कामगारांसाठी 20% बोनस व 30 दिवसांचे सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे. यामुळे सर्व कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांमध्ये मोठे आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून शेतकरी व ऊस उत्पादकांमध्येही आनंदाचे वातावरण आहे.
सहकारामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत असून त्यामुळे संगमनेर शहरातील बाजारपेठ भरलेली आहे अमृत उद्योग समूहातून विविध संस्थांमधून सुमारे 100 कोटी रुपये बाजारात येत असल्याने संगमनेरकरांची दिवाळी ही आनंदाची होत असते यावर्षीही दिवाळी होणार आहे.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले तर व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले यांनी आभार मानले यावेळी सभासद शेतकरी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभासदांना 30 किलो मोफत साखर
दरवर्षी सभासदांना दीपावलीनिमित कारखान्याकडून 15 किलो मोफत साखर दिली जाते. यावर्षी प्रत्येक शेअर्स साठी 30 किलो मोफत साखर देण्यात येणार असल्याचे कारखान्याचे मार्गदर्शक तथा विद्यमान चेअरमन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी जाहीर केले आहे. साखर घेण्यासाठी येताना सभासदांनी आपले डिजिटल कार्ड घेऊन यावे अथवा सोसायटीचे हमीपत्र व अधिकार पत्र घेऊन यावे असे आवाहन कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले आहे.



