ब्रेकिंग

विखे पाटील परिवाराच्या  चार पिढ्यासोबत कारखान्यासाठी ऊस तोडणी मजूर पुरवण्याचे काम अनेक मुकादमानी केले – शालिनीताई विखे पाटील

 विखे पाटील परिवाराच्या  चार पिढ्यासोबत कारखान्यासाठी ऊस तोडणी मजूर पुरवण्याचे काम अनेक मुकादमानी केले – शालिनीताई विखे पाटील

राहाता । प्रतिनिधी । पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्यासाठी ऊस तोडणी कामगार पुरवणाऱ्या मुकादम आणि ऊस तोडणी कामगारांचा कारखान्याच्या नावलौकीकात मोलाचा वाटा असल्याचे गौरवोद्गार जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांनी काढले. या कार्यक्रमात ३५० मुकादमांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

विखे कारखान्याचा डॉ.धनंजयराव गाडगीळ सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सौ.शालिनीताई विखे पाटील प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. ट्रक्स वाहतूक संस्थेचे अध्यक्ष नंदकिशोर राठी, कारखान्याचे उपाध्यक्ष सोपानराव शिरसाठ, ट्रक्स वाहतूक संस्थेचे उपाध्यक्ष सुनील जाधव, कारखान्याचे कार्यकारी संचालक महेश कोनापुरे, कारखान्याचे संचालक, अधिकारी यावेळी उपस्थित होते.प्रारंभी सर्व मुकादमांचा कारखान्याच्या वतीने सौ.विखे व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना सौ.विखे म्हणाल्या की, पद्मश्री विखे पाटील, पद्मभूषण विखे पाटील, ना.राधाकृष्ण विखे पाटील व डॉ.सुजय विखे पाटील या चार पिढ्यासोबत कारखान्यासाठी ऊस तोडणी मजूर पुरवण्याचे काम अनेक मुकादमानी केले आहे.आशिया खंडातील या पहिल्या कारखान्याचा नावलौकिक निर्माण होण्यात मुकादम आणि कामगार यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. ऊस तोडणी कामगारांच्या सोयी-सुविधांसाठी कारखाना कुठेही कमी पडणार नाही. मुलांच्या शिक्षणाची सोय आणि आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देऊ.सर्वांच्या सहकार्यामुळे संस्था वाटचाल करतात. कारखान्याचा विस्तार करण्यात आला असून चांगला गाळप हंगाम होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

कार्यकारी संचालक महेश कोनापुरे म्हणाले की, कारखान्याने ७६ वर्षांची अविरत वाटचाल केली आहे.देशात सर्वाधिक गाळप करणारा हा कारखाना होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जनरल मॅनेजर संजय मोरे यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, १ नोव्हेंबरला यावर्षीचा हंगाम सुरू करण्याचे नियोजन जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील व चेअरमन डॉ.सुजय विखे पाटील यांनी केले आहे.नवीन कारखाना सुरू होणार असल्याने सुरुवातीला ९ हजार मेट्रिक टन व एक आठवड्यानंतर ११ हजारांवर नेऊन पुढच्या काही दिवसात ११ हजाराने कारखाना चालेल.त्यासाठी मुकादमांनी त्या त्या भागातून ऊस तोडणी नियोजनाप्रमाणे होईल याकडे लक्ष द्यावे. कारखाना तुम्हाला चांगला व्यवसाय होण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करेल.अनेक पिढ्यांपासून या कारखाण्यासोबत असलेल्या मुकादमांचे कारखाण्यासोबत दृढ नाते निर्माण झाले आहे.१५ लाखांचे गाळप उद्दिष्ट्य असून आपल्या प्रत्येक अडचणी सोडविल्या जातील.१५० दिवसांच्या हंगामात चांगला व्यवसाय करण्याची संधी आहे. कारखाना आराखडा देईल त्यानुसार उसतोडणीचे काम होण्यासाठी मुकादम यांची प्रमुख जबाबदारी आहे.मुकादम आणि ऊस तोडणी कामगार कारखान्याचा आत्मा असल्याचे त्यांनी शेवटी सांगितलेमजूर पुरवठा व चांगले टनेज आणणाऱ्या मुकादमांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. मुकादमांच्या वतीने सौ. विखे यांचा सत्कार करण्यात आला.सौ.विखे यांनी आगामी गळीत हंगामात ५ हजार टन बैलगाडीने व ११ हजार टन ट्रॅक्टरने ऊस पुरवठा करणाऱ्यांना मी व्यक्तिगत बक्षीस देउन सन्मानित करीन अशी घोषणा सौ.विखे यांनी यावेळी केली. ऊस तोड विभाग प्रमुख एस. बी.चव्हाण,शेतकी विभाग प्रमुख किशोर आहेर, शेतकी अधिकारी विठ्ठल बेंद्रे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!