ब्रेकिंग

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचा साखर वाटप कार्यक्रम जाहीर

थोरात कारखान्याच्या सभासदांना 30 किलो मोफत साखर मिळणार

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचा साखर वाटप कार्यक्रम जाहीर

थोरात कारखान्याच्या सभासदांना 30 किलो मोफत साखर मिळणार
संगमनेर । प्रतिनिधी । काँग्रेस च्या राष्ट्रीय कमिटीचे सदस्य तथा महाराष्ट्राचे माजी महसूल व कृषिमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण देशातील सहकारी साखर कारखान्यासाठी दिशादर्शक ठरलेल्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने कायम शेतकरी सभासद उत्पादक व कामगार यांच्या जीवनात आनंद निर्माण केला आहे. दीपावली निमित्त यावर्षी सभासदांना 30 किलो मोफत साखर देण्यात येणार असून 15 ऑक्टोबर ते 18 ऑक्टोबर 2025 या काळात कारखाना कार्यस्थळावर साखर वाटप केली जाणार असल्याची माहिती व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले यांनी दिली आहे.

साखर वाटप कार्यक्रमाबाबत अधिक माहिती देताना पांडुरंग पाटील घुले म्हणाले की, थोर स्वातंत्र्यसेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्त्वावर कारखान्याची वाटचाल सुरू आहे. महाराष्ट्राचे माजी महसूल कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली दिवाळीनिमित्त कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना 200 रुपये तर कार्यक्षेत्राबाहेरील शेतकऱ्यांना 100 रुपये प्रति टन देण्यात आले आहे यामुळे कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना मागील हंगामाचा 3200 भाव मिळाला आहे. कामगारांसाठी 20% बोनस व 30 दिवसांचे सानुग्रह अनुदान दिले आहे.
तर माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी 15 किलो साखर सभासदांना मोफत देण्यात येत होती. यावर्षी 30 सप्टेंबर 2025 अखेर ज्यांचे शेअर्स मंजूर असतील अशा सभासदांना प्रत्येकी 30 किलो साखर मोफत देण्याचा संचालक मंडळांनी निर्णय घेतला आहे. यानुसार साखर गोडाऊन क्रमांक 13 मधून बुधवार दिनांक 15 ऑक्टोबर 2025 ते शनिवार दिनांक 18 ऑक्टोबर 2025 या काळात सकाळी 9 ते 5 वाजेपर्यंत सभासदांना 30 किलो मोफत साखर दिली जाणार आहे.यासाठी सभासदांनी दिलेले ओळखपत्र सोबत आणावे. त्याची झेरॉक्स चालणार नाही कारण हे ओळखपत्र स्कॅन करावे लागणार आहे. त्यांना ओळखपत्राच्या नोंदीवर गोडाऊन क्रमांक 13 मधून साखर देण्यात येईल. तर मयत सभासदांच्या साखळीसाठी छापील अर्ज त्या त्या गावांच्या सेवा सोसायट्यांमध्ये उपलब्ध असून मृत्यूचा दाखला वारसाचे आधार कार्ड जोडून शेअर्स विभागात अर्ज करावा. जे सभासद बाहेरगावी आहेत आणि त्यांचे ओळखपत्र तयार झालेले नाही. अशा सभासदांनी साखर घेण्यासाठी येताना एक फोटो व आधार कार्ड घेऊन यावा. स्वतः न येऊ शकणाऱ्या सभासदांनी सभासदाचा फोटो, आधार कार्ड, सोसायटी किंवा ग्रामपंचायत यांचे सही व शिक्का असलेले अधिकार पत्र देऊन दिलेल्या वेळेत साखर घ्यावयाचे आहे. साखर वाटप कार्यक्रमानंतर असे अधिकार पत्र स्वीकारले जाणार नाही. तसेच स्वतःचे शासकीय ओळखपत्र बरोबर आणणे आवश्यक आहे.

तरी सर्व सभासद बंधू – भगिनींनी साखर वाटप कार्यक्रमाप्रमाणेच साखर घेऊन जावी व साखर वाटपाबाबत सहकार्य करावे असे आवाहन व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले सर्व संचालक मंडळ व कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!