ब्रेकिंग

थोरात कारखान्याचा गुरुवारी ( दि.30 ऑक्टो ) गळीत हंगाम शुभारंभ

थोरात कारखान्याचा गुरुवारी ( दि.30 ऑक्टो ) गळीत हंगाम शुभारंभ
संगमनेर । प्रतिनिधी । सहकारासाठी दिशादर्शक ठरलेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सन 2025 – 26 या गळीत हंगामाचा शुभारंभ गुरुवार दिनांक 30 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 9.00 वा. कारखान्याचे चेअरमन लोकनेते माजीमंत्री बाळासाहेब थोरात व सौ.कांचनताई थोरात, मा.आ.डॉ.सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, ॲड.माधवराव कानवडे आणि डॉ.जयश्रीताई थोरात यांच्या उपस्थिती होणार असल्याची माहिती व्हा.चेअरमन पांडुरंग पाटील घुले यांनी दिली आहे.
जाहिरात मो-7756045359

याबाबत अधिक माहिती देताना पांडुरंग पाटील घुले म्हणाले की, महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री तथा काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली थोरात कारखान्यावर सभासद, शेतकरी व कार्यक्षेत्राबाहेरिल ऊस उत्पादक यांचाही मोठा विश्वास आहे. या कारखान्याने मागील हंगामात कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांकरता 3200 रुपये भाव दिला होता.सन 2025 – 26 या गळीत हंगामाचा शुभारंभ गुरुवार दिनांक 30 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 9.00 वा.माजीमंत्री बाळासाहेब थोरात व सौ.कांचनताई थोरात, मा.आ.डॉ.सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, ॲड.माधवराव कानवडे, बाजीराव पाटील खेमनर, सौ दुर्गाताई तांबे, डॉ.जयश्रीताई थोरात, रणजीतसिंह देशमुख, सुधाकर जोशी, संपतराव डोंगरे, शंकर पा.खेमनर, हौशीराम सोनवणे, रामहरी कातोरे, राजेंद्र गुंजाळ,अजय फटांगरे,सोमेश्वर दिवटे,निखिल पापडेजा, विश्वासराव मुर्तडक,सौ.अर्चनाताई बालोडे यांच्यासह सर्व जिल्हा परिषद व पंचायत समितीचे माजी सदस्य, नगरपालिकेचे माजी नगरसेवक अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

जाहिरात मो-7756045359

तरी या ऊस गळीत हंगामाच्या शुभारंभ कार्यक्रमासाठी तालुक्यातील सभासद ,शेतकरी, ऊस उत्पादक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर व सर्व संचालक मंडळ यांनी केले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!