पाकला धडा शिकवणाऱ्या स्व.इंदिरा गांधी देशाच्या कणखर पंतप्रधान – मा.आ.डॉ.सुधीर तांबे
अमृत उद्योग समूहाच्या वतीने स्व.इंदिरा गांधी व सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन

पाकला धडा शिकवणाऱ्या स्व.इंदिरा गांधी देशाच्या कणखर पंतप्रधान – मा.आ.डॉ.सुधीर तांबे

अमृत उद्योग समूहाच्या वतीने स्व.इंदिरा गांधी व सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन
यावेळी बोलताना मा.आ.डॉ.तांबे म्हणाले की, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांना स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या कणखर नेतृत्वाबद्दल नितांत आदर होता. इंदिराजींच्या कार्यातून पुढील पिढीला प्रेरणा मिळावी याकरता नवी दिल्लीच्या धरतीवर अमृत उद्योग समूहामध्ये त्यांनी शक्तीस्थळ निर्माण केले. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी विविध तज्ञ व्यक्तींची व्याख्याने आपण या ठिकाणी आयोजित करतो. इंदिराजींनी धर्मनिरपेक्ष भारताची पायाभरणी केली असून देशाच्या एकात्मतेसाठी बलिदान दिले. त्यांच्या बलिदानाचा विसर होणे हा कृतघ्नपणा आहे. देशाच्या विकासात इंदिरा पर्व अत्यंत महत्त्वाचे असून हरितक्रांती,विज्ञान क्रांती घडवणाऱ्या इंदिराजींनी पाकिस्तानला धडा शिकून बांगलादेशची निर्मिती केली. बँकांच्या राष्ट्रीयकरणासह अनेक मोठे निर्णय त्यांनी घेतले. आपल्या स्वकर्तृत्वावर आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठा दबदबा त्यांनी निर्माण केला. तर सरदार वल्लभभाई पटेल यांनी 600 संस्थांनी देशात विलगीकरणाचे काम केले सरदार पटेल हे भारतीय निष्ठेचे प्रतीक असल्याचे ते म्हणाले. पांडुरंग पाटील घुले म्हणाले की, आज देशामध्ये अस्थिरता निर्माण झाली आहे. मनभेद निर्माण झाले आहे. जाती – जातीमध्ये भांडणे लावले जात आहे. बेरोजगारी,महागाई प्रचंड वाढली आहे. फक्त जाहिरातबाजी मधून कणखरता दाखवली जाते मात्र सरकार हे पराभूत मानसिकतेचे असल्याचे ते म्हणाले तर प्रा. बाबा खरात म्हणाले की, देशाची अखंडता व एक राष्ट्रीय एकात्मता टिकवण्यासाठी बलिदान देणाऱ्या इंदिराजींचे जीवन कार्य तरुण पिढीसाठी सदैव प्रेरणादायी आहे. यावेळी अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांचे अधिकारी,पदाधिकारी,कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



