सर्वसामान्यांची समृद्धी हेच सहकाराचे व्रत – मा.मंत्री बाळासाहेब थोरात
राजहंस दूध संघामध्ये प्राथमिक संस्था सक्षमीकरण कार्यशाळा संपन्न
सर्वसामान्यांची समृद्धी हेच सहकाराचे व्रत – मा.मंत्री बाळासाहेब थोरात

राजहंस दूध संघामध्ये प्राथमिक संस्था सक्षमीकरण कार्यशाळा संपन्न

आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त संगमनेर तालुका सहकारी दूध संघाचे वतीने आयोजित ‘प्राथमिक संस्था बळकटीकरण व सहकारातून समृद्धी’ या कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी चेअरमन रणजितसिंह देशमुख हे होते तर व्यासपीठावर ॲड.माधवराव कानवडे, पांडुरंग पाटील घुले, व्हाईस चेअरमन राजेंद्र पाटील चकोर, सुधाकर जोशी, लक्ष्मणराव कुटे, संपतराव डोंगरे, रामहरी कातोरे, आर.बी राहणे, संचालक विलासराव वर्पे, भास्करराव सिनारे, संतोष मांडेकर, विलास कवडे, बबन कुराडे, बादशहा वाळुंज, संजय पोकळे, विक्रमराजे थोरात, विष्णू ढोले, तुकाराम दातीर, रवींद्र रोहम, भारत मुंगसे, गोरख नवले, के.के. थोरात, कार्यकारी संचालक डॉ.सुजित खिलारी, सेवानिवृत्त सहाय्यक निबंधक ॲड.अनिल भांगरे आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले की, सहकाराचे विचार मंथन व्हावे हा या कार्यशाळेचा उद्देश असून संगमनेर तालुक्यातील सहकारी संस्थांमुळे नागरिकांच्या जीवनामध्ये समृद्धी निर्माण झाली आहे.यावेळी रणजित देशमुख म्हणाले की, दूध व्यवसाय हा अत्यंत कष्टाचा व अविरतपणे चालणारा व्यवसाय आहे. या व्यवसायात सुट्टी नसते. कोरोनाच्या काळात संपूर्ण जग बंद असतांना सुद्धा दुग्ध व्यवसायातील सर्व घटक अविरतपणे काम करत होते. त्यामुळे या व्यवसायात असणारे सर्वच घटक हे महत्त्वपूर्ण आहेत. अनेक समस्या असल्या तरी दुग्ध व्यवसाय समाधान देणारा आहे. सहकारात कायमच शेतकऱ्यांचे हित जपले जाते. सहकार आपल्याला टिकवायचा आहे आणि वाढवायचा आहे.दूध उत्पादकांनी गोठा, मिल्कींग मशीन व संस्थांनी बल्क मिल्क कुलर यांच्या स्वच्छतेला प्राधान्य दिले पाहिजे. दूध संस्थेला दोन वेळेस दुधाचा पुरवठा केला पाहिजे. याचबरोबर कमी गाई संख्येमध्ये जास्त दूध उत्पादकता वाढवण्यासाठी अधिक काम होणे गरजेचे आहे. दूध संघाच्या माध्यमातून मुरघास, मुक्त संचार गोठा या संकल्पना अत्यंत प्रभावीपणे राबवल्या गेल्या असून गुणवत्तापूर्ण मुरघास बनवण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. पारदर्शक कामकाज करून दूध संघाने दूध दर फरक आणि चांगला भाव दिला आहे.दूध भावाचे चढ-उतार कायम होत असतात. या व्यवसायात अनेक अडचणी असल्या तरीही गावपातळीवरील पदाधिकारी आणि सचिवांचे चांगले काम आहे, हे आपल्या तालुक्याचे वैशिष्ट्य ठरले आहे.

प्राथमिक सहकारी संस्थांनी स्वच्छतेवर अधिक भर देताना दोन्ही सत्रात, वेळेत दूध संकलन करण्याचे आवाहनही त्यांनी केले. याचबरोबर प्राथमिक संस्था अधिक सक्षमीकरणासाठी विद्युत सोलरसह, जलशुद्धीकरण प्रकल्प, पशुखाद्यविक्री, पशुवैद्यकीय मेडिकल इ. विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे ते म्हणाले.यावेळी ॲड.अनिल भांगरे यांनी सहकारी संस्थांचे कायदे व नियम या विषयावर व कार्यकारी संचालक डॉ.सुजित खिलारी यांनी कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक करून स्वच्छ दूध निर्मितीबाबत उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. तर व्हा.चेअरमन राजेंद्र चकोर यांनी आभार मानले. यावेळी संगमनेर तालुक्यातील प्राथमिक सहकारी संस्थांचे चेअरमन व्हाईस चेअरमन सचिव व दूध उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दोन वेळा दूध संकलनासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करागाईची कास, दूध काढण्याचे मशीन स्वच्छ करण्याबरोबर शेतकऱ्यांनी गोठा कायम स्वच्छ ठेवला पाहिजे. याचबरोबर प्राथमिक संस्थांनी बल्क कुलर व त्यांची स्वच्छता ठेवून दोन वेळेस दूध संकलन करावे असे सांगताना प्राथमिक संस्थांमध्ये दूध संकलन वाढीसाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी काम करावे, असे आवाहन केले याचबरोबर राजहंस दूध संघाचे सर्व पदार्थ हे अत्यंत गुणवत्तेचे असून सर्व शेतकरी, व्यापारी तसेच नागरिक यांनी या उपपदार्थांचा जास्तीत जास्त वापर करावा असे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांनी म्हटले आहे
सहकाराची प्रतिज्ञा
तालुक्यातील सहकार सक्षमपणे पुढे घेऊन जाण्यासाठी, आधुनिक तत्रज्ञानाचा वापर व पारदर्शक कारभार करून, सहकारातून समृद्धीकडे वाटचाल करण्यासाठी व सहकाराचे जाळे वृद्धींगत करण्यासाठी उपस्थितांनी सहकाराची प्रतिज्ञा घेतली



