ब्रेकिंग

संगमनेर तालुक्यातील १८ गावांना ट्रान्सफॉर्मर मंजुरी

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांतून दीड कोटींचा निधी

संगमनेर तालुक्यातील १८ गावांना ट्रान्सफॉर्मर मंजुरी 

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांतून दीड कोटींचा निधी

संगमनेर । प्रतिनिधी । संगमनेर तालुक्यातील वीजपुरवठा व्यवस्थेत सुधारणा आणि शेतीसाठी स्थिर व अखंड वीजपुरवठा सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने आमदार सत्यजीत तांबे यांच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यातील १८ गावांना नवीन ट्रान्सफॉर्मर साठी तब्बल दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून ग्रामीण भागातील नागरिक आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

आमदार सत्यजीत तांबे यांनी प्रत्येक गावाची समस्या ऐकून घेतली. सातत्याने प्रयत्न केले आणि अखेर दीड कोटींचा निधी मंजूर करून आणला हा खरा जनतेसाठीचा विकास आहे. या निर्णयामुळे संगमनेर तालुक्यातील वीज वितरण प्रणाली अधिक सक्षम होणार असून शेती, उद्योग आणि ग्रामीण विकासाचा वेग अधिक वाढेल.

यामध्ये प्रामुख्याने अंभोरे, कुंभारवाडी, कोळवडे, घुलेवाडी, जाखोरी, जोर्वे, डिग्रस, तळेगाव, नांदुरी दुमाला, मांडवे बु., मालुंजे, रणखांब वाडी, राजापूर, वरवंडी (जनतानगर), हिवरगाव पावसा, मालुंजे, संगमनेर खुर्द यांसह एकूण १८ गावांचा समावेश आहे. दीर्घकाळापासून वीजदाब कमी होणे यांसह खंडित वीजपुरवठा आणि सिंचनात अडथळे अशा समस्या या भागात कायम होत्या. त्या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा म्हणून आमदार तांबे यांनी संबंधित विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला.

जाहिरात – मो-7756045359

“संगमनेर तालुक्यातील वीजपुरवठा अधिक सक्षम व्हावा, शेतकऱ्यांना सिंचनासाठी पुरेशी वीज उपलब्ध व्हावी आणि नागरिकांना अखंड सेवा मिळावी असे आमदार तांबे यांनी सांगितले. तसेच जिल्हानियोजनच्या या निधीबद्दल आमदार सत्यजीत तांबे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचेही आभार मानले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!