ब्रेकिंग

शिक्षकांचा सन्मान म्हणजे संस्कृतीचा सन्मान – आरोग्यदुत बाळासाहेब गव्हाणे

जवळके के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात संपन्न

शिक्षकांचा सन्मान म्हणजे संस्कृतीचा सन्मान – आरोग्यदुत बाळासाहेब गव्हाणे

जवळके के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात संपन्न

कोपरगांव । प्रतिनिधी । संपूर्ण जिल्ह्यात शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात नावलौकिक असलेल्या के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयात ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस संपूर्ण भारतभर शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. याप्रसंगी कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे तसेच जवळके परिसराचे आरोग्यदुत बाळासाहेब गव्हाणे यांनी सर्व शिक्षक-शिक्षिका, विद्यार्थी व पालक यांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

जाहिरात – 7756045359

यावेळी इयत्ता 12 वी चे विद्यार्थी विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांच्या भूमिकेत जाऊन विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिकवण्याचा आनंद घेतला. प्रमुख पाहुणे आरोग्यदुत बाळासाहेब गव्हाणे व सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब राहाणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमात सर्व शिक्षक शिक्षिकांना विद्यार्थी शिक्षकांच्या हस्ते भेटवस्तू व गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी आरोग्यदुत बाळासाहेब गव्हाणे यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला. यावेळी संबोधित करतांना बाळासाहेब गव्हाणे यांनी विद्यार्थ्यांना उद्याचे सुजाण, सुसंस्कृत नागरिक होण्यासाठी आवश्यक बदल अंगीकृत करण्याचे आवाहन केले. यावेळी विद्यार्थीनी प्राचार्य सानिया सय्यद , शिक्षक झालेले व कावेरी गोरडे , प्राजक्ता बोरसे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विद्यार्थीनी सृष्टी पाचोरे हिने केले तर आभार विद्यार्थिनी समीक्षा झिंजुर्डे हिने मानले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!