बाळासाहेब गव्हाणे व मित्र परिवाराच्या वतीने महिलांना मोफत देवदर्शन यात्रेचे आयोजन
बाळासाहेब गव्हाणे व मित्र परिवाराच्या वतीने महिलांना मोफत देवदर्शन यात्रेचे आयोजन

कोपरगाव । विनोद जवरे ।
नेहमी सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक कार्यात आग्रेसर असणारे तालुक्यातील अंजनापूरचे दानशूर व्यक्तिमत्त्व म्हणून सर्वपरिचित असलेले बाळासाहेब यशवंत गव्हाणे व मित्रपरिवाराच्या वतीने अंजनापुर गावातील महिलांना मोफत देवदर्शनाचे यात्रेचे आयोजन केले असून सर्वत त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

बाळासाहेब गव्हाणे व मित्रपरिवाराने या पूर्वी बाळासाहेब गव्हाणे यांच्या आजोबांच्या स्मरणार्थ क्रिकेटप्रेमी साठी भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते तसेच शिवजयंती निमित्त ४०० शिवभक्तांना शिवनेरीचे दर्शन घडवून आणले होते. गावात आयोजित केलेल्या मोफत आरोग्य शिबिरात ८०० हुन अधिक गरजूंनी सहभाग नोंदवला यातील ४०० हून अधिक गरजूंना स्व:खर्चाने नंबरच्या चष्म्याचे वाटप केले तर परिसरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची मोफत रक्त तपासणी केली. शाळेतील विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान मिळावे या उद्देशाने शाळेत संगणक भेट देत प्रजासत्ताक दिनी सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करत वेगवेगळ्या परीक्षेत व खेळात प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देखील वाटप केली अशा एक ना अनेक सामाजिक शैक्षणिक कार्यात आग्रेसर असणारे गव्हाणे यांनी गावातील महिलांसाठी ही मोफत देवदर्शन यात्रा आयोजित केली आहे.

मंगळवारी दिनांक १ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ६ वाजता या यात्रेचा श्री क्षेत्र बजरंगबली प्रांगण अंजनापुर येथून प्रारंभ होणार असून त्यानंतर यात्रा तुळजापूर, पंढरपूर, जेजुरी,मोरगावचा गणपती, थेऊरचा गणपती, श्री क्षेत्र संभाजी महाराज समाधी स्थान तुळापूर व आळंदीचे दर्शन घेऊन श्री क्षेत्र अंजनापुर तालुका कोपरगाव येथे समाप्त होणार आहे. सदर देवदर्शनाच्या दिवशी मुक्कामाच्या ठिकाणी ह.भ.प भास्कर महाराज गव्हाणे यांचे प्रवचन होणार आहे तर सर्व सहभागी महिलांना नाष्टा व जेवणाची सोय देखील करण्यात आली आहे तरी जास्तीत जास्त महिला भाविकांनी रविवार दि ३० मार्च २०२५ पर्यंत नाव नोंदणी करत मोठ्या संख्येने या देवदर्शन यात्रेचा लाभ घ्यावा असे आवाहन बाळासाहेब गव्हाणे व मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले. तसेच अधिक माहिती साठी ९६०७४०७७७७ व ७७५६०६७८०४ या नंबर वर संपर्क साधावा.




