ब्रेकिंग

महिला व नागरिकांच्या तात्काळ सुरक्षेसाठी नगरपरिषदेचे रक्षक दल

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने लोकार्पण

महिला व नागरिकांच्या तात्काळ सुरक्षेसाठी नगरपरिषदेचे रक्षक दल
महाराष्ट्रात प्रथमच रक्षकदल कार्यान्वित

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने लोकार्पण

संगमनेर । प्रतिनिधी । लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर हे सुसंस्कृत व वैभवशाली म्हणून राज्याला परिचित आहे. या शहरात महिला मुली व नागरिकांच्या तात्काळ सुरक्षेसाठी आमदार सत्यजित तांबे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रात प्रथमच नगरपरिषदेच्या पुढाकारातून रक्षक दल ही संकल्पना राबविण्यात येत आली असून नागरिकांच्या सेवेसाठी आज या रक्षक दलाचा शुभारंभ झाला.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे नगर परिषदेच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने रक्षक दलाचा शुभारंभ केला .यावेळी मा. नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे, आमदार सत्यजित तांबे, नगराध्यक्ष डॉ. मैथिलीताई तांबे, एकविराच्या अध्यक्षा डॉ जयश्रीताई थोरात, उपनगराध्यक्ष नूर मोहम्मद शेख, काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, माजी नगराध्यक्ष विश्वासराव मुर्तडक, नितीन अभंग, दिलीपराव पुंड, किशोर टोकसे, नगरसेविका सीमा खटाटे, भारत बोराडे सौ अर्चना दिघे सौरभ कासार शोभा पवार प्राची काशीद, डॉ.अनुराधा सातपुते वनिता गाडे ,गजेंद्र अभंग,अमजद पठाण ,श्रीमती विजया गुंजाळ, शकीला बेग ,सरोजना पगडाळ, डॉ दानिश ,,सौ प्रियंका शहा, नंदा गरुडकर ,शैलेश कलंत्री मुजीब खान पठाण, प्रांताधिकारी अरुण उंडे, तहसीलदार धीरज मांजरे, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक समीर बारवकर, आयडीबीआय बँकेचे मॅनेजर निखिल सावंत, विशाल बोरस्ते ,विवेक  आंचन, एमएसएफचे प्रकाश रावते,मुख्याधिकारी दयानंद गोरे राजेंद्र गुंजाळ प्रल्हाद देवरे, निखिल पापडेजा आदींसह विविध अधिकारी उपस्थित होते.

संगमनेर शहरातील महिला मुली व नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणेबरोबरच नगरपरिषदेने तात्काळ सुरक्षा मिळावी याकरता आमदार सत्यजित तांबे यांच्या संकल्पनेतून राज्यात प्रथमच रक्षक दल स्थापन केले आहे. कुठे काही अनुचित घटना घडल्यानंतर तात्काळ 9067273273 या नंबर वर संपर्क केल्यास रक्षक दल उपस्थित राहणार आहेत. यामुळे गैरवर्तन करणाऱ्यांना मोठी चपराक मिळणार आहे. आयडीबीआय बँकेच्या वतीने नगर परिषदे करता चार चाकी वाहन व दोन बुलेट गाडी दिली असून या माध्यमातून हे जवान तात्काळ उपस्थित राहणार आहेत.याप्रसंगी बोलताना आमदार तांबे म्हणाले की महाराष्ट्रात प्रथमच ही अभिनव संकल्पना राबविण्यात आली असून हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. महिलांचा सन्मान आणि नागरिकांना सुरक्षा हे प्रत्येकाचे मूलभूत कर्तव्य असून पोलीस यंत्रणे बरोबरच हे रक्षक दल त्वरित सुरक्षेसाठी सेवा देणार आहेत .यावेळी नगराध्यक्ष डॉ मैथिलीताई तांबे म्हणाल्या की संगमनेर नगर परिषदेच्या सर्व कामांमध्ये नागरिकांचा मोठा सहभाग असून नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत ही अभिनव संकल्पना राबवण्यात आली आहे याचबरोबर विविध विकास कामांमधून संगमनेर हे सर्वांना सोबत घेऊन आणखी पुढे घेऊन जाण्यासाठी आपला प्रयत्न असणार आहे असे त्या म्हणाल्या.. सूत्रसंचालन सरोजना पगडाल यांनी केले तर सीमाताई खटाटे यांनी आभार मानले. यावेळी संगमनेर शहरातील विविध पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नगराध्यक्ष डॉ मैथिलीताई तांबे यांच्या नेतृत्वात शहरात रक्षक दलाची भव्य रॅली

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने नगरपालिकेने राज्यात अभिनव उपक्रम राबवून रक्षक दल स्थापन केले आहेत. तात्काळ सुरक्षेसाठी 9067273273 हा संपर्क क्रमांक उपलब्ध असून चार चाकी वाहन व दोन बुलेट गाड्या असलेल्या या रक्षक दलाने संगमनेर शहरातून भव्य रॅली काढली यामध्ये स्वतः नगराध्यक्ष डॉ. मैथिलीताई तांबे यांनी सुरक्षा रक्षक वाहन चालवून नेतृत्व केले. या अभिनव उपक्रमाचे संपूर्ण संगमनेर मधून अभिनंदन होत आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!