कोपरगाव शहरासाठी तुमच्या योगदानाची अगोदर आकडेमोड करा- बाळासाहेब आढाव

कोपरगाव शहरासाठी तुमच्या योगदानाची अगोदर आकडेमोड करा- बाळासाहेब आढाव


कोपरगाव शहरासाठी तुमच्या योगदानाची अगोदर आकडेमोड करा- बाळासाहेब आढाव
कोपरगांव । प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या सौ. गौरी पहाडे यांनी कोपरगाव नगरपरिषदेला दिलेले पत्र अगोदर नीट वाचा आणि नंतर कोपरगाव शहरासाठी तुमचे काय योगदान आहे याची आकडेमोड करा असा उपरोधिक सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते बाळासाहेब आढाव यांनी उपनगराध्यक्ष जितेंद्र यांना दिला आहे.

रविवारी अक्षयतृतीयेच्या दिवशी प्रभाग क्र. ३ मध्ये श्री स्वामी समर्थ केंद्राच्या सभामंडप भूमिपूजन प्रसंगी कोल्हे गटाच्या गुंड प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या दम बाजूच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी बुधवार दिनांक २२ रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेवर बहिष्कार टाकण्याबाबत पत्र देऊन सदर पत्रात आमचा सर्वसाधारण सभेवर बहिष्कार आहे मात्र कोपरगाव शहराच्या विकासाला आणि सर्वसाधारण बैठकीत घेतल्या जाणाऱ्या सर्व विकासाभिमुख निर्णयांना आमचा पाठिंबा राहणार असल्याचे अधिकृत पत्र दिले होते परंतु अर्धवटराव असलेले व कोपरगाव शहरासाठी कोणतेही योगदान नसलेले उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर यांनी ते पत्र अर्धवट वाचून केलेल्या टीकेला बाळासाहेब आढाव यांनी रोखठोक उत्तर दिले आहे.ते म्हणाले की, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेवर बहिष्कार टाकला असला तरीही कोरगावकरांच्या हिताचे सर्व निर्णय आणि शहर विकासाच्या प्रत्येक कामासोबत राष्ट्रवादीचे नगरसेवक आहेत मात्र जिथे शहराचे वातावरण खराब होईल अश्या प्रत्येक कामाच्या विरोधात आम्ही खंबीरपणे उभे राहू. शहर विकासाला आमचा कोणताही आणि कधीही विरोध नाही. मात्र ज्यांनी शहर विकासासाठी किंवा नागरिकांच्या सुख सुविधांसाठी एक गुंठाही जागा दिली नाही. ज्यांचे कोपरगावच्या जडणघडणीत कोणतेही योगदान नाही त्यांनी कितीही प्रेस नोट देऊन किंवा प्रसार माध्यमांमध्ये खोट्या बातम्या देऊन काही सध्या होणार नाही.कोपरगावकर अभ्यासू आहेत त्यांच्याकडे प्रत्येकाच्या योगदानाची आकडेमोड आहे त्यामुळे तुमची सुद्धा आकडेमोड कोपरगावकरांकडे आहे. आणि किती विकास कामांना कोणी विरोध केला आणि कोण न्यायालयात गेले होते हे पण कोपरगावकरांना माहित आहे.त्यामुळे तुम्ही शहराच्या विकासात किती योगदान दिले आहे याची चांगली आकडेमोड करा. भ्रष्टाचाराची श्वेतपत्रिका निश्चित काढा आणि जे दोषी असतील त्यांच्यावर नक्कीच कारवाई झाली पाहिजे. एकतर तुम्ही श्वेतपत्रिका काढा नाहीतर आम्ही तरी तुमच्या तीन महिन्यांच्या कारभाराची आकडेमोड जनतेपुढे मांडून तुमची खरी आकडेमोड बाहेर काढू असे आव्हान राष्ट्रवादी कार्यकर्ते बाळासाहेब आढाव यांनी उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर यांना दिले आहे.



