जिल्हाभरातून शुभेच्छांचा वर्षाव; सुजय दादांचा अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात पार

जिल्हाभरातून शुभेच्छांचा वर्षाव; सुजय दादांचा अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात पार

जिल्हाभरातून शुभेच्छांचा वर्षाव; सुजय दादांचा अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात पार
अहिल्यानगर । प्रतिनिधी । युवा नेते व माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त जिल्ह्यात आज दिवसभर शुभेच्छांचा उत्साह उसळला. जनसेवा फाउंडेशन व डॉ. सुजय विखे पाटील युवा मंच यांच्या वतीने दोन ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या भव्य कार्यक्रमास कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

सकाळी ९ ते १२ या वेळेत डॉ. धनंजयराव गाडगीळ सभागृह, प्रवरानगर येथे शुभेच्छा स्वीकार सोहळा पार पडला. त्यानंतर दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत अहिल्यानगर येथील विळद घाट, जिमखाना हॉल (डॉ. विखे पाटील फाउंडेशन) येथे दुसरा सोहळा आयोजित करण्यात आला. दोन्ही ठिकाणी डॉ. सुजय पाटील यांनी स्वतः उपस्थित राहून कार्यकर्त्यांच्या मनःपूर्वक शुभेच्छा स्वीकारल्या.

कार्यक्रमास जिल्ह्यातील विविध भागांतून युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. प्रत्येक ठिकाणी उत्साह, जयघोष आणि स्वागताचे विविध उपक्रम पाहायला मिळाले.या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने राज्यातील अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. राज्याचे कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री तसेच महाराष्ट्रातील अनेक आमदार–खासदार यांनी फोनद्वारे आणि प्रत्यक्ष हजेरी लावून डॉ. सुजय पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांच्या नेतृत्वगुणांचे, विकासदृष्टीचे आणि कार्यकर्त्यांशी असलेल्या आत्मीयतेचे विशेष कौतुकही मान्यवरांनी व्यक्त केले.डॉ. सुजय पाटील हे जिल्ह्याच्या प्रगतीचे भविष्यदर्शी नेतृत्व आहे,अशा प्रतिक्रिया अनेक मान्यवरांकडून व्यक्त झाल्या.

काही कार्यकर्त्यांनी क्रेनद्वारे भव्य पुष्पहार अर्पण करत दादांप्रति अत्यंत प्रेम व आदर व्यक्त केला. ढोल-ताशांच्या गजरात, पारंपरिक नृत्यात, घोषणांनी व आकर्षक सजावटीने संपूर्ण परिसर दणाणून गेला. सुजय दादांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा या गजरात वातावरण अधिकच उत्साहपूर्ण झाले.दोन्ही ठिकाणच्या कार्यक्रमांचे उत्कृष्ट नियोजन आणि व्यवस्थापन जनसेवा फाउंडेशन तसेच डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन, विळद घाट यांनी शिस्तबद्ध पद्धतीने केले. स्वागत कक्ष, मार्गदर्शन पथके, वाहनतळ सुविधा, शिस्तबद्ध रांग व्यवस्थापन, सर्वत्र उत्तम आयोजन पाहायला मिळाले.कार्यक्रम संपेपर्यंत शुभेच्छा देणाऱ्यांची रांग अखंड सुरू होती. कार्यकर्त्यांची आपुलकी, मान्यवरांचा सहभाग आणि जनतेची प्रेमळ उपस्थिती यांच्या संगमामुळे हा अभिष्टचिंतन सोहळा स्मरणात राहील असा भव्य आणि उत्साहपूर्ण ठरला.जिल्ह्यातील युवा, महिला, ज्येष्ठ नागरिक, सामाजिक संस्था, विविध संघटनांचे प्रतिनिधी तसेच अनेक प्रतिष्ठित नागरिकांची लक्षणीय उपस्थिती यावेळी पाहायला मिळाली.रहीमपूर येथील युवक कार्यकर्ते श्री. सचिन शिंदे व श्री. रवींद्र (पप्पू) गाढे यांनी डॉ. सुजयदादा विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त फ्लेक्स-बॅनर खर्च टाळून गावातील महिलांसाठी मोहटा देवी, मढी, शनी शिंगणापूर या ठिकाणी मोफत देवदर्शनाची व्यवस्था केली. आज सकाळी सर्व महिलांच्या उपस्थितीत दादांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.लोणी येथे पायरेन्स क्लब यांच्या वतीने ५० किलोचा “टायगर केक” कापून डॉ. सुजय विखे पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.



