आ. आशुतोष काळेंच्या पाटबंधारे विभागाला सूचना
तळेगाव ब्रांचमधून सर्व ओढे, बंधारे, साठवण तलाव भरून द्या

आ. आशुतोष काळेंच्या पाटबंधारे विभागाला सूचना

तळेगाव ब्रांचमधून सर्व ओढे, बंधारे, साठवण तलाव भरून द्या
कोपरगांव । प्रतिनिधी । निळवंडे कालव्यांना सोडण्यात येणाऱ्या आवर्तनातून तळेगाव ब्रांचला पाणी सोडून लाभ क्षेत्राच्या सर्व गावातील ओढे, बंधारे,साठवण तलाव व गावतळे पूर्ण क्षमतेने भरून द्या अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभागाचे उपकार्यकारी अभियंता महेश गायकवाड यांना दिल्या आहेत.

कोपरगाव मतदार संघातील निळवंडे कालव्यांच्या लाभक्षेत्रातील रांजणगाव देशमुख व परीसरातील जिरायती गावांमध्ये आ. आशुतोष काळेंच्या नियोजनबद्ध पाठपुराव्यातून नियमितपणे तळेगाव ब्रांचमधून निळवंडेचे पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे कधी काळी नेहमीच टँकरवर आवलंबून रहावे लागणाऱ्या या जिरायती गावांना भर उन्हाळ्यात देखील पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत नाही. ज्या ज्यावेळी नागरिकांची आवर्तनाची मागणी होईल त्या-त्यावेळी आ.आशुतोष काळे यांच्या सूचनेनुसार तातडीने आवर्तन सोडण्यात येत असल्यामुळे या भागातील शेतकरी आणि नागरिक सुखावले आहेत. मागील काही दिवसांपासून तापमानात झालेला बदल आणि त्यामुळे उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याच्या अडचणी निर्माण होवू नयेत यासाठी आ.आशुतोष काळे यांनी निळवंडे कालव्याचे आवर्तन सोडण्याच्या सूचना केल्या आहेत. सोडण्यात येणाऱ्या आवर्तनातून तळेगाव ब्रांचला पाणी सोडून सर्व लाभधारक गावातील साठवण तलाव,गावतळे, साठवण बंधारे काळजीपूर्वक पूर्ण क्षमतेने भरून देण्याच्या अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी केल्या आहेत.उन्हाची तीव्रता हळूहळू वाढण्यास सुरुवात होवून उन्हाळ्याची चाहूल लागली आहे त्यामुळे उन्हाळ्यात या गावातील नागरीकांना पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या चाऱ्याची टंचाई जाणवणार नाही. ओढे, गावतळे, पाझर तलाव, साठवण बंधारे पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर पिण्याच्या पाण्याची अडचण तर दूर होवून भूजल पातळी वाढण्यास मदत होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उन्हाळी चारा पिकांना पाणी देण्यासाठी काही अंशी पाण्याची मदत होणार असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.



