ब्रेकिंग

नगराध्यक्ष डॉ.मैथिलीताई तांबे यांच्या विशेष प्रयत्नातून 1500 जन्म, मृत्यू दाखल्यांचे वितरण

नगराध्यक्ष डॉ.मैथिलीताई तांबे यांच्या विशेष प्रयत्नातून 1500 जन्म, मृत्यू दाखल्यांचे वितरण

प्रलंबित अर्जांवरील दाखल्यांचे तातडीने वितरण

संगमनेर । प्रतिनिधी । नागरिकांच्या विविध प्रश्नांची तातडीने सोडवणूक करण्याकरता पुढाकार घेऊन प्रशासन काळामध्ये अनेक दिवसांच्या रखडलेल्या 1500 जन्ममृत्यू दाखल्यांचे तातडीने वितरण नगराध्यक्ष डॉ.मैथिलीताई तांबे यांनी केले आहे. यामुळे शहरातील अनेक नागरिकांना बऱ्याच दिवसानंतर दिलासा मिळाला आहे.

लोकनेते बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ.सुधीर तांबे व आमदार सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर सेवा समितीच्या सर्व नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांनी नागरिकांना तातडीने चांगल्या सुविधा देण्याकरता प्रभावी उपाय योजना आखल्या आहेत.प्रशासकीय राजवटीच्या कालखंडानंतर नव्याने पदभार घेतल्यानंतर विविध विभागांमधील कर्मचाऱ्यांची संख्या प्रमाणापेक्षा कमी असल्यामुळे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त भार आहे. जन्ममृत्यू या विभागात अनेक नागरिकांची खूप प्रकरणे प्रलंबित होती. यामुळे शहरातून व बाहेरगाहून येणाऱ्या नागरिकांची वर्दळ  होती. नागरिक व कर्मचारी यामध्ये काही वेळेस वादाची प्रसंग उभे राहिले. नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून नगराध्यक्ष डॉ.मैथिलीताई तांबे यांनी तातडीने पुढाकार घेत जन्म,मृत्यू दाखल्यांच्या नोंदीसाठी विशेष मोहीम राबवली. या अंतर्गत संगमनेर शहरातील रुग्णालयांमध्ये जन्म झालेल्या व मृत पावलेल्या व्यक्तींची नोंदणी करण्यासाठी पुढाकार घेतला व त्यांच्या प्रयत्नातून सुमारे पंधराशे जन्म मृत्यूच्या दाखल्याची नोंद करून वाटप करण्यात आली.नगराध्यक्ष डॉ.मैथिलीताई तांबे व मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी पुढाकार घेऊन या पुढील काळात नागरिकांना जन्म मृत्यूचे दाखले त्वरित वितरण करणे बाबत सर्व कर्मचाऱ्यांना सूचना केल्या आहे.त्यांच्या या कार्याची दखल घेऊन संगमनेर शहरातील सर्व नागरिकांनी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष नूर मोहम्मद शेख, सर्व नगरसेवक, नगरसेविका व मुख्याधिकारी दयानंद गोरे यांचे विशेष आभार मानले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!