वडाळा बहीरोबा येथे गावठी कट्टा बाळगणारा आरोपी एलसीबीच्या जाळ्यात जेरबंद

वडाळा बहीरोबा येथे गावठी कट्टा बाळगणारा आरोपी एलसीबीच्या जाळ्यात जेरबंद

अहिल्यानगर । प्रतिनिधी । मा. श्री सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध अग्निशस्त्रे बाळगणारे इसमांची माहिती काढुन कारवाई करणेबाबत आदेश दिलेले आहेत.
सदर आदेशानुसार श्री किरणकुमार कबाडी, स्थानिक गुन्हे शाखा यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे राहुल द्वारके, दिपक घाटकर, लक्ष्मण खोकले, ह्रदय घोडके, सोमनाथ झांबरे, राहुल डोके, किशोर शिरसाठ, यांचे पथक तयार करुन सदर पथकास नेवासा तालुक्यामध्ये अवैध शस्त्रे बाळगणारे इसमांची माहिती काढुन कारवाई करणेबाबत पथकास सुचना व मार्गदर्शन करुन पथक रवाना केले होते.दिनांक 25/02/2026 रोजी नमुद पथक हे सोनई पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध शस्त्रे बाळगणारे इसमांची माहिती काढत असतांना पथकास गुप्त बातमीदारामार्फत इसम नामे प्रदिप जगधने रा.वडाळा बहीरोबा ता.नेवासा हा वडाळा बहीरोबा गावात त्याचे कमरेला गावठी कट्टा लावुन फिरत असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानुसार पथकाने बातमीतील ठिकाणी हॉटेल संदिपचे पाठीमागे सापळा लावला असता एक इसम संशयीतरित्या फिरतांना दिसुन आला. सदर इसमास ताब्यात घेवुन त्यास त्याचे नांव गांव विचारता त्याने त्याचे नांव प्रदिप मोहन जगधने वय- 21 वर्षे रा. वडाळा बहिरोबा ता.नेवासा जि. अहिल्यानगर असे असल्याचे कळविले. ताब्यातील इसमाची झडती घेतली असता त्याचे कब्जातुन 1) 30,000/- रुपये किमतीचे एक गावठी पिस्टल (अग्निशस्त्र), असा एकुण 30,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ताब्यातील इसमाविरुध्द पोकॉ/782 किशोर आबासाहेब शिरसाठ नेम – स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांचे फिर्यादीवरुन सोनई पोलीस ठाणे गु.र.नं. 72/2026 आर्म ऍ़क्ट 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास सोनई पोलीस स्टेशन करीत आहे. सदरची कारवाई श्री. सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.



