ब्रेकिंग
राजकीय हेतूने प्रेरित होऊन विरोधकांकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न – सरपंच अमोल गुंजाळ

गुंजाळवाडी सरपंच पदाबाबत विरोधकांकडून तथ्यहीन आरोप
संगमनेर । प्रतिनिधी । राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे असलेल्या गुंजाळवाडी ग्रामपंचायत मध्ये आपण अत्यंत प्रामाणिकपणे काम करत आहोत. सतत होणारी विकास कामे आणि जनतेचा पाठिंबा हे विरोधकांना पहावत नसल्याने त्यांनी सातत्याने अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला . मा. उच्च न्यायालय यांनी असे कोणतेही आदेश दिले नसल्याने विरोधक फक्त राजकीय हेतू ठेवून पत्रकबाजी करून जनतेची दिशाभूल करत असल्याची टीका गुंजाळवाडी गावचे लोकनियुक्त सरपंच नरेंद्र उर्फ अमोल गुंजाळ यांनी केली आहे.

माध्यमांमधून प्रसिद्ध होणाऱ्या बातम्यानबाबत दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात सरपंच अमोल गुंजाळ यांनी म्हटले आहे की, 2023-24 मध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत गुंजाळवाडी मधील तमाम मतदार बंधू भगिनींनी मोठ्या मताधिक्याने मला निवडून दिले. जनतेच्या विश्वासाच्या पाठबळावर आपण सातत्याने विकास कामे राबवली आणि ही विकास कामे विरोधकांना सहन झाली नाही. म्हणून त्यांनी मला थांबवण्यासाठी विविध षडयंत्र बनवले. मा जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी माझ्या विरोधातील तक्रार फेटाळली. यानंतर माननीय उच्च न्यायालय यांनी सुद्धा या प्रकरणात काहीही मत दिले नाही .सर्वोच्च न्यायालयाच्या विविध दाखल्यांचा संदर्भ देत त्यांनी आदेशाचे पालन करण्याची निर्देश दिले. यानुसार माझे काम सातत्याने सुरू आहे. सदर याचिका उच्च न्यायालयात घेण्याबाबत माझे वकील यांनी ही संमती दिली होती विरोधकांनी ज्या सिटी सर्वे क्रमांक 160 161 आणि 162 या बाबत आक्षेप नोंदवला आहे. ती जागा आमच्या कुटुंबीयांची आहे आणि आजही ती जागा मोकळी आहे. जीपीएस द्वारे सुद्धा त्याची मोजणी केली असता ती जागा मोकळी आहे. तेथे कोणतेही बांधकाम नाही.नोकरीत असताना निवडणूक लढवणे यासाठी परवानगी घेणे बंधनकारक नसतानाही आपण संस्थेची परवानगी घेतली आहे. विविध धार्मिक आणि सामाजिक कामांमधून सातत्याने जनतेची सेवा आपण केली आहे. निवडणुकीनंतर कधीही पक्षपात केलं नाही. मात्र विरोधकांना आपला वाढत चाललेला जनाधार पहावत नसल्याने ते निराधार आरोप करून जनतेची दिशाभूल करत आहे. सरपंच पदाबाबत अप्पर आयुक्त नाशिक व उच्च न्यायालय औरंगाबाद यांचे कोणतेही आदेश नाही. असे असतानाही चांगल्या कामांमध्ये आडकाठी निर्माण करत आहे. पत्रकबाजी व सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीचे आरोप करून जनतेची दिशाभूल करत आहेत. अशी खोटी माहिती प्रसिद्ध केल्याबद्दल संबंधितांवर लवकर पंढरीचा खटला व याचिका दाखल करणारे आहोत. त्यामुळे अशा निराधार व तत्येहीन आरोपांवर कोणीही विश्वास नका असे आवाहन करताना आपण प्रामाणिक आणि जनतेच्या सेवेसाठी कटिबद्ध असल्याचे सरपंच अमोल गुंजाळ यांनी म्हटले आहे.सरपंच नरेंद्र उर्फ अमोल गुंजाळ यांच्या वतीने उच्च न्यायालयात ॲड सोनकवडे यांनी काम पाहिले. विभागीय अप्पर आयुक्त नाशिक यांच्याकडे ॲड प्रशांत गुंजाळ यांनी काम पाहिले