ब्रेकिंग

यशोधन मध्ये मराठी भाषा दिनानिमित्त काव्यसंमेलन

यशोधन मध्ये मराठी भाषा दिनानिमित्त काव्यसंमेलन

संगमनेर । प्रतिनिधी । महाराष्ट्राचे माजी महसूल व शिक्षण मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन जनसंपर्क कार्यालयात संगमनेर मधील साहित्यिक कवी यांच्या उपस्थितीमध्ये मराठी भाषा गौरव दिनानिमित्त काव्य संमेलन व मराठी भाषा समृद्धीसाठी विशेष चर्चा झाली असून मराठी भाषा समृद्धीसाठी प्रत्येकाने योगदान द्यावे असे आवाहन मा आ डॉ सुधीर तांबे यांनी यावेळी केले आहे.

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन कार्यालयात कवी संमेलन संपन्न झाले यावेळी अध्यक्षस्थानी मा आ डॉ.सुधीर तांबे हे होते. तर समवेत सौ दुर्गाताई तांबे, कवी डॉ विवेक वाकचौरे, व्यंगचित्रकार अरविंद गाडेकर ,कवी अनिल देशपांडे, प्रा बाबा खरात, कवी अशोक वालझाडे,अशोक वरुडे, दिलीप उदमले, नंदकुमार बेल्हेकर, दीपक टाक, सौ अनुराधा आहेर ,रामनाथ सातपुते, प्राचार्य रमेश शिंदे ,राजाभाऊ भडांगे ,डॉ कोमल देशमुख, एजाज मन्सुरी ,अपर्णा दानी ,प्रा.सुरेश परदेशी, डॉ कोमल मस्के, सुविधा आरासिद्ध ,आनंद गायकवाड , रश्मीका मारवाडी, प्रा.विनोद राऊत, बाळकृष्ण महाजन, डॉ. राहुल हांडे ,डॉ राजेंद्र जोरवर, डॉ. नितीन भांड, अनिल सोमणी, पत्रकार गोरक्ष मदने, गौतम गायकवाड, सुभाष भालेराव, सुखदेव गाडेकर, सलीम शेख, राजेश जेधे आदींसह विविध साहित्यिक उपस्थित होते.

यावेळी बोलताना मा आ.डॉ. सुधीर तांबे म्हणाले की ,कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त मराठी भाषा गौरव दिन आपण मोठ्या उत्साहात साजरा करतो. खरे तर मराठी भाषा ही संवादाचे साधन नसून ती आपली संस्कृती आहे. तिचा आपल्या सर्वांना अभिमान आहे.महाराष्ट्र सरकारने मराठी शाळांना अधिक पाठबळ दिले पाहिजे .भाषेला अभिजात दर्जा दिला .परंतु तिच्या समृद्धीसाठी सुद्धा प्रयत्न करणे गरजेचे आहे . संत ज्ञानेश्वर, संत  तुकाराम ,जनाबाई बहिणाबाई अशी मोठी संत परंपरा असलेल्या महाराष्ट्राने मराठी भाषा समृद्ध केले असून प्रत्येकाने मराठी भाषेचा अभिमान बाळगावा. याचबरोबर या भाषेच्या समृद्धीसाठी लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली साहित्यिक कवी यांना सोबत घेऊन एक संगमनेर पॅटर्न आपण तयार करू असे ते म्हणाले.तर सौ दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, जगात कुठेही गेले तरी आपल्याला सर्वांना मराठीचा अभिमान वाटतो. आपण सर्वजण मराठी शाळेत शिकले असल्याने मराठीशी सर्वांची जवळीक आहे. या भाषेमध्ये वाक्प्रचार, म्हणी या अलंकार म्हणून असून प्रत्येकाने जास्तीत जास्त वाचन करावे याचबरोबर वाचन मंडळाच्या माध्यमातून संगमनेर मध्ये वाचन चळवळ समृद्ध होत असल्याच्या त्या म्हणाल्या.या कवी संमेलनाची सुरुवात प्रा. बाबा खरात यांनी श्वापदांना  भाळणारी माणसे मी पाहिली अंगावर शहारे आणणारी कविता सादर केली. प्रा सुरेश परदेशी यांनी बोलतो मराठी, ऐकतो मराठी हे गीत सादर केले. तर कवी अशोक वालझाडे यांनी आता वय झाले या कवितेने डोळ्यात पाणी आणले. अनिल देशपांडे यांनी मला जगायला सवड कुठे होती ही कविता सादर केली. तर नंदकुमार बेलेकर यांनी मराठी साहित्य नभांगनी उगवला कुसुमाग्रज तारा ही कविता गायली .डॉ कोमल देशपांडे यांनी तू आज जगून घे ही महिला सबलीकरणाची कविता सादर केली .तर विनोद राऊत यांनी शेवटी शेवटी खूप आल्यासरीची हलकीफुलकी कविता गायली. इजाज मन्सुरी यांनी माय मराठी ही कविता सादर केली. रमेश शिंदे यांनी ओढ गावाकडची या कवितेने ग्रामीण संस्कृतीचे वर्णन दर्शवले .तर डॉ. कोमल भास्कर यांनी आसवानी मी मला विझवू कशाला ही कविता सादर केली. अपर्णा दाणी यांनी संतपरंपरेची थोरवी गाणारी आणि पंढरीचा राया ही कविता सादर केली तर डॉ. विवेक वाकचौरे यांनी सादर केलेल्या जीवनात आता निवांत झालो या कवितेने अंगावर शहरांना आनंद गायकवाड यांनी ही माझी माय मराठी तर सुविधा आरासिद्ध यांनी गळ्यामध्ये माळ दे हातामध्ये टाळले ही कविता सादर केली.विविध कवींनी केलेल्या सादरीकरणाला अनिल सोमणी यांच्या खुमासुधार निवेदनाने रंगत आणली. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ.नितीन भांड यांनी केले.

मराठी साहित्य समृद्धतेसाठी मा. मंत्री बाळासाहेब थोरात यांचे मोठे योगदान.

लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी सहकार, शिक्षण ,कृषी, ग्रामीण विकास, दूध या क्षेत्रात योगदान देण्याबरोबर मराठी साहित्य समृद्धतेसाठी सातत्याने काम केले आहे .विविध साहित्यिकांना संगमनेर मध्ये बोलून त्यांचे विचार जनतेपर्यंत नेले आहे. याचबरोबर यशवंतराव चव्हाण यांचा वारसा जोपासताना साहित्यिकांचा कायम सन्मान केला आहे .नाशिक येथील मराठी साहित्य संमेलनात त्यांचे झालेले भाषण हे संस्मरणीय ठरले आहे.याचबरोबर नुकतेच त्यांनी साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्ष प्रा तारा भावाळकर व डॉ अ.ह. साळुंखे यांची भेट घेऊन साहित्य संस्कृती बाबत चर्चा केली असून साहित्यिकांना मदत करण्याचे काम त्यांनी केले असल्याचे सर्व साहित्यिकांनी सांगितले त्याचबरोबर लोकनेते बाळासाहेब थोरात यांचे कायम सातत्याने वाचन असून वाचनाचा व्यासंग त्यांनी आयुष्यभर जपला असल्याचे सौ दुर्गाताई तांबे यांनी सांगितले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!