ब्रेकिंग
सरकारने शेतकरी कर्ज विळख्यातून मुक्त करावा
सरसकट कर्जमाफी आवश्यक तर नियमित कर्ज भरणाऱ्यांना एक लाख रुपये अनुदान मिळावे

संगमनेर । प्रतिनिधी । राज्य सरकारने जाहीर केलेला अर्थसंकल्प हा सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांची निराशा करणारा आहे. मोठमोठी आश्वासने असणाऱ्या या अर्थसंकल्पातून कर्जमाफीची जी घोषणा झाली आहे ती अगदी तुटपुंजी आहे. सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना कर्ज विळख्यातून मुक्त करताना सरसकट कर्जमाफी करणे आवश्यक असल्याची मागणी काँग्रेस पक्षाचे नेते तथा माजी महसूल व कृषी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी अर्थसंकल्पावर बोलताना म्हटले आहे की, महाविकास आघाडी सरकारने विनाअट शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांची कर्जमाफी व नियमित कर्ज भरणाऱ्यांना 50 हजारांचे अनुदान दिले होते. यामध्ये कोणत्याही अटी नव्हत्या सहजतेने त्या शेतकऱ्यांना मिळाल्या.त्यानंतर पाच सहा वर्षाचा काळ लोटला आहे. शेतकरी हा अडचणीत आहे. शेतकऱ्यांना दोन लाखाच्या कर्जमाफीने काही होणार नसून शेतकरी पूर्णपणे कर्जाच्या विळख्यातून बाहेर येईल यासाठी सरकारने ठोस पावले उचलण्याची गरज होती. याकरता सरसकट कर्जमाफी करणे आवश्यक असून नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 1 लाख रुपयांचे अनुदान दिले पाहिजे. अशी मागणी केली तर सध्या आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे शेतकरी आणि फळ उत्पादक अडचणीत आले आहे. द्राक्ष आणि डाळिंब या पिकांच्या बरोबर इतर फळबागांकरिता सरकार काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.मागील वर्षी राज्यामध्ये अतिवृष्टी झाली .अनेकांच्या जमिनी वाहून गेल्या. त्यांना अद्याप मदत मिळालेली नाही. दोन लाख रुपयांची कर्जमाफी तुटपुंज ची मदत असून सरकारने सरसकट कर्जमाफी करावी अशी मागणी करताना शेतकरी हा जगाचा पोशिंदा असून शेतकऱ्याकडे सरकारचे होणारे दुर्लक्ष की अत्यंत दुर्दैवी असल्याची टीका काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

उत्तर महाराष्ट्रासाठी अर्थसंकल्प निराशा जनक – आमदार तांबे
राज्य सरकारने जाहीर केलेला अर्थसंकल्प हा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या आकस्मात निधनामुळे अपूर्ण वाटतो आहे. हा अर्थसंकल्प काही बाबींमध्ये चांगला असला तरी उत्तर महाराष्ट्रासाठी अत्यंत निराशादायक आहे. उत्तर महाराष्ट्रासाठी अर्थसंकल्पामध्ये कोणतीही तरतूद नसल्याची खंत आमदार सत्यजित तांबे यांनी व्यक्त केली

युवकांसाठी निराशा जनक अर्थसंकल्प–डॉ.जयश्रीताई थोरातराज्यामधील अनेक उद्योग बाहेर गेले आहेत. शेतकरी सर्वसामान्य नागरिक अडचणीत आहे. युवकांपुढे बेरोजगारीचा मोठा प्रश्न आहे. असे असताना घोषणा मोठ्या मात्र उत्तर सापडत नसून युवकांसाठी हा अर्थसंकल्प अत्यंत निराशा जनक असल्याची टीका संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्रीताई थोरात यांनी केली आहे.