ब्रेकिंग

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद

जळगाव धुळे येथील विविध मोठ्या कार्यक्रमांना उपस्थिती

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद

जाहिरात मो-7756045359
जळगाव धुळे येथील विविध मोठ्या कार्यक्रमांना उपस्थिती
जळगाव । प्रतिनिधी । काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा राज्याचे मा. महसूल व कृषी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी उत्तर महाराष्ट्रातील धुळे जळगाव या जिल्ह्यांचा दौरा केला असून विविध तालुक्यांमधून नागरिकांचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. धुळे येथील राजवाडे इतिहास संशोधन मंडळाचे इतिहास जतन व संशोधन करण्याचे अत्यंत मौलिक काम केले असल्याचे गौरवोद्गार याप्रसंगी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले आहे.

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन कार्यक्रम व धुळे येथील राजवाडे इतिहास संशोधक मंडळाच्या वतीने 100 वर्षात पदार्पण व खासदार शरदचंद्रजी पवार यांचा कृतज्ञता सोहळा संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर जेष्ठ नेते खासदार शरदचंद्रजी पवार, आमदार एकनाथराव खडसे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, आमदार जयंत पाटील, शशिकांत शिंदे, हर्षवर्धन पाटील , माजी मंत्री दिलीप वळसे पाटील हे उपस्थित होते तर धुळे येथील कार्यक्रमात वरील मान्यवरांसह मंत्री जयकुमार रावल,खासदार अमोल कोल्हे उपस्थित होते.यावेळी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, इतिहासाचार्य वि.का राजवाडे संशोधन मंडळ धुळे ही संस्था शंभराव्या वर्षात पदार्पण करत आहे या 100 वर्षाच्या वाटचालीमध्ये खासदार शरदचंद्र पवार यांनी या संस्थेला मोठा आधार दिला आहे.

यशवंतराव चव्हाण साहेब यांच्यानंतर महाराष्ट्रामध्ये शरदचंद्रजी पवार यांचा कालखंड सुरू झाला. विविध प्रश्नांची जाण असलेले आणि नेमका प्रश्न समजून त्यावर उत्तर देणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे महाराष्ट्राच्या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी मोठे योगदान दिले आहे त्यांच्या प्रतिकृतज्ञता व्यक्त होणे आनंदाचा क्षण आहे.इतिहास जतन करणे ही सोपी गोष्ट नाही शेकडे वर्षापूर्वीच्या इतिहासाचा बारकाईने अभ्यास करून त्याचे दस्तऐवजीकरण करणे व सोप्या भाषेत मांडणी करणे यासाठी मोठी मेहनत आणि चिकाटी लागते आपल्या गावाला आणि परिसराला ऐतिहासिक ओळख म्हणून देण्याचे काम राजवटी इतिहास संशोधन मंडळांनी केले आहे. आणि हा इतिहास जपणारे आणि तो जिवंत करणारे खासदार डॉ. अमोल कोल्हे हे आहेत.संगमनेरचा आणि धुळे संशोधन मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाठक यांच्या समवेत संजय मुंदडा यांचेही काम मोठे आहे संजय मुंदडा हे संगमनेरचे जावई आहेत. सातत्याने या कार्यक्रमासाठी त्यांचा पाठपुरावा सुरू होता.तर मुक्ताईनगर येथे बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की एकनाथ खडसे यांनी राजकारण विरहित माणसे जोडले. 1990 पासून ते विधिमंडळात कार्यरत आहेत तापी खोरे विकास महामंडळ निर्मितीचे श्रेय हे एकनाथराव खडसे यांना आहे.यावेळी खासदार शरदचंद्र पवार म्हणाले की, भाजप पक्ष वाढवण्यामध्ये एकनाथ खडसे यांचा मोठा वाटा राहिला आज भाजप जो सत्तेत आहे तो महाराष्ट्रात एकनाथ खडसे यांच्यामुळे आहे तर धुळे येथील राजवाडे संशोधन मंडळांनी इतिहास संशोधन करून पुढील अनेक पिढ्यांसाठी वैभवशाली व प्रेरणादायी इतिहास निर्माण केला आहे हे काम यापुढेही त्यांना चालू ठेवावे लागणार आहे.

यावेळी खासदार डॉ अमोल कोल्हे म्हणाले की पुरोगामी विचार जपणारा महाराष्ट्राचा सह्याद्री आज पवार साहेब आपल्यामध्ये आहेत. त्यांच्या प्रेरणादायी विचारातून महाराष्ट्राची वाटचाल आपल्याला सुरू ठेवायची आहे. माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री जयकुमार रावल, अरुण भाई गुजराती यांनीही आपली मनोगत व्यक्त केली. यावेळी अरुण गुजराती,उत्तर महाराष्ट्रातील विविध मान्यवरांसह संगमनेरचे डॉ संतोष खेडलेकर उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगमनेरचे डॉसंजय मालपाणी यांनी केले. उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यामध्ये माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी चोपडा तालुक्यातील अरुण गुजराथी यांच्या निवासस्थानी भेट दिली. तर जळगाव येथे कार्यकर्त्यांची बैठक घेतली यानंतर पारोळा धुळे या ठिकाणीही कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या या सर्व बैठकांना काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व इतर पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!