रयत शिक्षण संस्था सातारा मधील उपक्रमशील शिक्षक सुहास भावसार यांना ‘राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार’ जाहीर

रयत शिक्षण संस्था सातारा मधील उपक्रमशील शिक्षक सुहास भावसार यांना ‘राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार’ जाहीर


रयत शिक्षण संस्था सातारा मधील उपक्रमशील शिक्षक सुहास भावसार यांना ‘राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार’ जाहीर
कोपरगाव । प्रतिनिधी । शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य आणि गुणवंत विद्यार्थ्यांच्या घडणीसाठी दिलेल्या अविरत योगदानाची दखल घेत, ‘ध्येय एज्युकेशन फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य’ यांच्या वतीने संगमनेर येथील उपक्रमशील शिक्षक श्री. सुहास विजय भावसार यांना यंदाचा ‘राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२५’ जाहीर करण्यात आला आहे.

रयत शिक्षण संस्थेच्या श्री गणपतराव रभाजी औताडे पाटील माध्यमिक विद्यालय पोहेगाव (ता. पोहेगाव जि. अहिल्यानगर) येथे कार्यरत असलेले श्री. भावसार यांनी आपल्या सात्यत्यपूर्ण कार्याने, शैक्षणिक उपक्रमातील नवीनता व समाजातील प्रभावी योगदानाने स्वतःचा वेगळा ठसा उमटविला आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी त्यांची अहोरात्र चाललेली धडपड वाखाणण्याजोगी आहे. त्यांच्या याच कार्याचा गौरव म्हणून त्यांना या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.या संदर्भातील माहिती देताना ध्येय एज्युकेशन फाऊंडेशनचे संस्थापक/अध्यक्ष श्री. सुदाम विठ्ठल शेंडे यांनी सांगितले की, “शिक्षण क्षेत्रात निष्ठेने काम करणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन देणे, हे आमचे कर्तव्य आहे. श्री. सुहास भावसार यांच्यासारख्या मान्यवर शिक्षकांचा गौरव करणे, हे आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.”

ध्येय एज्युकेशन फाऊंडेशन ही संस्था महाराष्ट्र राज्यातच नव्हे, तर संपूर्ण देशातील विद्यार्थ्यांसाठी एक मार्गदर्शक दीपस्तंभ ठरली आहे. संस्थेमार्फत आय.एम विनर राज्यस्तरीय टॅलेंट सर्च परीक्षा, शिष्यवृत्ती योजना, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा, ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी मोफत शैक्षणिक साधनसामग्री, ऑनलाइन व प्रत्यक्ष मार्गदर्शन, तसेच शिक्षक व विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे विविध उपक्रम यशस्वीरीत्या राबविले जात आहेत. आज लाखो विद्यार्थी आणि शेकडो शिक्षक या संस्थेच्या कार्याचा लाभ घेत आहेत.२९ मार्च रोजी पुण्यात होणाऱ्या ‘ध्यास एज्युकेशन आयकॉन्स समिट २०२६’ मध्ये प्रदान करणार पुरस्कार श्री. सुहास भावसार यांना हा पुरस्कार ‘ध्येय एज्युकेशन आयकॉन्स समिट २०२६’ च्या भव्य सन्मान सोहळ्यात प्रदान करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम येत्या रविवार, २९ मार्च २०२६ रोजी होणार आहे. यासाठी पुण्यातील निगडी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृह, महानगरपालिका पिंपरी चिंचवड हे स्थळ निश्चित करण्यात आले आहे. या सोहळ्यात राज्यभरातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत श्री. भावसार यांचा यथोचित सत्कार केला जाईल. या बातमीमुळे कोपरगाव व संगमनेर शहरासह संपूर्ण शिक्षण क्षेत्रात आनंद व्यक्त केला जात आहे. रयत शिक्षण संस्थेतील सर्व पदाधिकारी यांनी त्यांचे विशेष कौतुक केले आहे.



