ब्रेकिंग

कामाच्या ठिकाणी महिलांची सुरक्षितता आणि ‘अंतर्गत तक्रार समिती’ अनिवार्य – असावरी देशपांडे

कामाच्या ठिकाणी महिलांची सुरक्षितता आणि ‘अंतर्गत तक्रार समिती’ अनिवार्य – असावरी देशपांडे

जाहिरात
कामाच्या ठिकाणी महिलांची सुरक्षितता आणि ‘अंतर्गत तक्रार समिती’ अनिवार्य – असावरी देशपांडे

लोणी । प्रतिनिधी ।  कामाच्या ठिकाणी महिलांना निर्भयपणे काम करता यावे यासाठी पोषक वातावरण तयार करणे ही काळाची गरज आहे. ज्या ठिकाणी १० किंवा त्यापेक्षा जास्त महिला-पुरुष कर्मचारी एकत्र काम करतात, तिथे पॉश कायद्यानुसार अंतर्गत तक्रार समिती स्थापन करणे बंधनकारक आहे, असे प्रतिपादन नाशिक येथील विपुल फाउंडेशनच्या असावरी देशपांडे यांनी केले.
प्रवरा अभिमत विद्यापीठाच्या कम्युनिटी मेडिसिन विभागांतर्गत महिला सक्षमीकरण सेल आणि तक्रार निवारण समितीच्या वतीने आयोजित पॉश अ‍ॅक्ट कार्यशाळेत त्या मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या. याप्रसंगी व्यासपीठावर कुलगुरू डॉ. व्ही. एन. मगरे, कुलसचिव डॉ. योगेंद्र सिंग, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश जगदाळे, डॉ. मोहन पवार, नर्सिंग अधीक्षक डॉ. संगीता विखे, दंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजू अनर्थे, समिती अध्यक्षा डॉ. अनिता मुंडे, डॉ. वैशाली फाळके आणि सचिव डॉ. दिपाली हांडे उपस्थित होते.


असावरी देशपांडे यांनी कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) कायदा, २०१३ यावर सविस्तर मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या की, हा कायदा केवळ शिक्षेसाठी नसून तो एक प्रतिबंधात्मक उपाय आहे. कर्मचाऱ्यांनी आणि विद्यार्थ्यांनी आपल्या अधिकारांबाबत जागरूक राहणे आवश्यक आहे. यावेळी त्यांनी लैंगिक छळाचे विविध प्रकार, जसे की शारीरिक, शाब्दिक किंवा खुणांद्वारे केला जाणारा छळ यावर प्रकाश टाकला. तसेच, पीडित महिला घटनेच्या ३ महिन्यांच्या आत समितीकडे लेखी तक्रार करू शकते आणि अशा तक्रारींची माहिती गुप्त ठेवणे कायद्याने बंधनकारक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. वैशाली फाळके यांनी केले, तर सूत्रसंचालन दीपक काळे यांनी केले. या कार्यशाळेला विद्यापीठातील मोठ्या संख्येने महिला कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!