आजपासून श्री क्षेत्र बहादरपूर येथे संत सद्गुरु गोपाजी बाबांचा अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यास सुरूवात
सप्ताह कालावधीत राज्यभरातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तन सेवा

आजपासून श्री क्षेत्र बहादरपूर येथे संत सद्गुरु गोपाजी बाबांचा अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यास सुरूवात

सप्ताह कालावधीत राज्यभरातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तन सेवा
कोपरगांव । प्रतिनिधी । सर्व भाविक-भक्तांना कळविण्यात अत्यंत आनंद वाटतो की, सालाबादप्रमाणे याही वर्षी भगवंताच्या कृपेने साधु संतांच्या आशिर्वादाने, ह.भ.प. वैराग्यमुर्ती श्रीराम महाराज गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच समस्त ग्रामस्थ बहादरपुर यांच्या मार्गदर्शनाने चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यास मंगळवार दिनांक 7 एप्रिल रोजी सप्ताह सोहळ्यास प्रारंभ होत आहे या सप्ताहात कालावधी दररोज विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यांत आलेले आहे.

या काळात राज्यभरातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तन सेवा सप्ताह कालावधीत संपन्न होणार आहे
यामध्ये 7 एप्रिल रोजी ह.भ.प. साईराम महाराज रहाणे ( श्री क्षेत्र बहादरपुर ) ,8 एप्रिल रोजी ह.भ.प. बाळासाहेब महाराज रंजाळे ( निमगाव खैरी) 9 एप्रिल रोजी ह.भ.प. किरण महाराज कोल्हे ( कोल्हेवाडी),10 एप्रिल रोजी ह.भ.प.जगन्नाथ महाराज उंबरकर ( उंबरी बाळपूर ) ,11 एप्रिल रोजी ह.भ.प.अरूण महाराज दिघे ( तळेगाव दिघे) , 12 एप्रिल रोजी ह.भ.प. कृष्णानंद महाराज ( बेलापूर ),13 एप्रिल रोजी ह.भ.प. श्रीराम महाराज गाडेकर ( अंजनापुर ) 14 एप्रिल ह.भ.प. गोविंद महाराज मलिक यांचे सकाळी 9 ते 11 कालावधीत काल्याचे किर्तन तसेच यावेळी ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे तरी परिसरातील सर्व भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आव्हान यावेळी बहादरपुर ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आलेले आहे.



