ब्रेकिंग

प्रशिक्षणांतून व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून पुढे जावे – सौ.शालीनीताई विखे पाटील

प्रशिक्षणांतून व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून पुढे जावे – सौ.शालीनीताई विखे पाटील

जनसेवा फौडेशन अंतर्गत महिलांना प्रशिक्षण

लोणी । प्रतिनिधी । महिलांनी प्रशिक्षणाच्या माध्यमातून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग व्यावसायिक दृष्टिकोन वाढीसाठी करावा जोपर्यंत आपल्याला आत्मविश्वास येत नाही. तोपर्यंत व्यवसायामध्ये माहिती घेत रहा. आपल्याबरोबरच इतरांनाही मदत करा.एकल महिलांना समजून घ्या. जनसेवा फौडेशनच्या माध्यमातून आजपर्यंत विविध प्रशिक्षणाच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्यावरती भर दिला आहे . आपला हक्काचा व्यवसाय आपण सुरू करावा प्रशिक्षण जनसेवा फौडेशन देईल असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी केले.

जनसेवा फौडेशन,लोणी आणि पंचायत समिती राहाता यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महिलांसाठीच्या ब्युटी पार्लर प्रशिक्षणाच्या प्रमाणपञ वितरण प्रसंगी सौ. विखे पाटील बोलत होत्या. यावेळी जनसेवा फाउंडेशनच्या संज्जला लांडगे, बाभळेश्वरच्या कृषी विज्ञान केंद्राच्या विस्तार विभागाच्या प्रमुख डॉ. प्रियंका खर्डे, प्रशिक्षिका स्वाती लड्डा, पंचायत समितीच्या अंगणवाडी पर्यवेक्षिका सोनाली कुंजीर आदींसह प्रशिक्षणार्थी महिला उपस्थित होत्या.यावेळी बोलतांना सौ. विखे पाटील म्हणाल्या, आज जनसेवा फौडेशनच्या माध्यमातून जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून शिर्डी मतदार संघाबरोबरच अहिल्यानगर जिल्ह्यातील महिलांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध उपक्रमाचे आयोजन केले जाते. महिलांनी विविध प्रशिक्षणाच्या माध्यमातून पुढे जातांना आपला व्यवसाय वाढवण्यावरती भर द्यावा. व्यवसायाचे परिपूर्ण ज्ञान घेऊन आपल्या ग्राहकांच्या आवडीनिवडी जपण्याचे काम करावे.जनसेवा फौडेशनच्या माध्यमातून आज चाळीस हजाराहून अधिक महिलांना विविध प्रकारच्या प्रशिक्षणातून स्वयंरोजगार दिला असल्याचे सांगत विखे पाटील परिवार विविध उपक्रमाच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्यावरती भर देण्याबरोबरच महिला बचत गट आणि या गटाच्या माध्यमातून व्यवसाय निर्मिती करून सक्षम करत आहे. एकल महिलांना समाजाने समजून घेण्याची गरज व्यक्त करुन या महिलांसाठी विविध उपक्रम सुरू आहेत त्यांच्यासाठी ही मंत्री विखे पाटील यांनी विविध उपक्रम राबवीत असतात. प्रशिक्षणामध्ये महिलांनी सक्रिय सहभाग घेऊन आत्मविश्वासाने आपला व्यवसाय वाढीस लावावा असेही त्यांनी सांगितले.

प्रारंभी सज्जला लांडगे यांनी जनसेवा फौंडेशन आणि कृषी विज्ञान केंद्र बाबळेश्वर यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध प्रशिक्षणाची माहिती देण्याबरोबरच या प्रशिक्षणातून मिळालेल्या माहिती बरोबरच यामध्ये नव कौशल्य अवगत करावे असे सांगितले. प्रशिक्षिका स्वाती लड्डा यांनी जनसेवा फाउंडेशन च्या माध्यमातून प्रशिक्षण देत असताना मला मोठा आत्मविश्वास मिळाला. यावेळी मनोगत व्यक्त केलेल्या महिलांची नावे आशा कडसकर, सविता उंडे, निकिता फणसे, प्राजक्ता ब्राम्हणे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.या प्रशिक्षणांमध्ये शिर्डी मतदार संघातील ६१ महीलांनी सहभाग घेतला.प्रशिक्षणार्थींना व्यवसाय किटचे वितरण सौ.विखे पाटील यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार डॉ. प्रियंका खर्डे यांनी मानले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!