ब्रेकिंग

शिर्डी पोलिसांची ‘लाखोंची’ कारवाई; ५५ मोबाईल जप्त, १८.३४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

शिर्डी पोलिसांची ‘लाखोंची’ कारवाई; ५५ मोबाईल जप्त, १८.३४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

शिर्डी पोलिसांची ‘लाखोंची’ कारवाई; ५५ मोबाईल जप्त, १८.३४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

शिर्डी । प्रतिनिधी । शिर्डी परिसरासह अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्यातील हद्दीतून चोरीला गेलेल्या मोबाईलचा शोध घेत शिर्डी पोलिसांनी धडाकेबाज कारवाई केली. या कारवाईत विविध नामांकित कंपन्यांचे तब्बल ५५ मोबाईल जप्त करण्यात आले असून, या मुद्देमालाची एकूण किंमत १८ लाख ३४ हजार रुपये आहे.

दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री शिर्डी पोलिसांचे पथक पेट्रोलिंग करीत असताना दत्तनगर, शिर्डी-राहाता परिसरातील एका घराबाबत संशयास्पद हालचालींची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन इसम घराच्या मागील बाजूस असलेल्या दरवाजातून अंधाराचा फायदा घेत घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे निदर्शनास आले. मात्र, पोलिसांची चाहूल लागताच संशयित पसार झाले.पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता तेथे एक बॅग मिळून आली. या बॅगेमध्ये विविध नामांकित कंपन्यांचे एकूण ५५ मोबाईल आढळून आले. पोलिसांनी सदर मोबाईलचा पंचनामा करून मुद्देमाल ताब्यात घेतला. त्याची किंमत तब्बल १८ लाख ३४ हजार रुपये आहे.या प्रकरणी शिर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ८६१/२०२६, भारतीय न्याय संहितेच्या कलम १२२, १२४ अन्वये दि. ३० सप्टेंबर २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.

अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पथकाची कामगिरी

ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंणजीत गलांडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

५५ मोबाईल… किंमत तब्बल १८ लाख ३४ हजार!

शिर्डी पोलिसांच्या कारवाईत विविध नामांकित कंपन्यांचे तब्बल ५५ मोबाईल जप्त करण्यात आले. चोरीच्या मोबाईलचा शोध घेत केलेल्या या कारवाईत १८ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत झाला असून, संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू आहे.

कारवाईत पोलीस अधिकारी सपोनि कल्पेश कुमार चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक सागर काळे, पोउनि महादेव गुट्टे, पोउनि प्रदीप बो-हाडे, पोलीस कर्मचारी आकाशा जाधव, तसेच पोहेकॉ/१४३२ लांडे, पोहेकॉ/४७३ संतोष वाघ, पोहेकॉ अण्णासाहेब दातीर, पोहेकॉ चव्हाण, पोकॉ नामदेव नालेगावकर, पोकॉ प्रसाद सूर्यवंशी, पोकॉ इनामदार, पोकॉ केवलसिंग राजपूत, पोकॉ दिवे, पोकॉ२४७४ दिनेश कांबळे, पोका प्रमोद जाधव, पोकॉ अजय अंधारे, पोकॉ/९४० कोतकर यांनी सहभाग घेतला.तसेच अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर येथील पोहेकॉ सचिन धनाड व पोलीस मित्र योगेश शिंदे यांनीही संयुक्तरित्या कारवाईत सहभाग घेतला. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ/१४३२ लांडे करीत आहेत.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!