ब्रेकिंग

अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाची  राष्ट्रीय पातळीवर छाप

SAE India आणि REEV 2026 स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक

अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाची  राष्ट्रीय पातळीवर छाप

SAE India आणि REEV 2026 स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक
संगमनेर । प्रतिनिधी ।  अमृतवाहिनी अभियांत्रिकी महावि‌द्यालयाने SAE India आयोजित प्रतिष्ठित TIFAN 2026 आणि REEV 2026 या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक पटकावत उल्लेखनीय दुहेरी यश संपादन केले आहे. या कामगिरीमुळे महावि‌द्यालयाने तांत्रिक शिक्षण, संशोधन आणि नावीन्यपूर्ण प्रकल्प विकास क्षेत्रात आपली भक्कम ओळख पुन्हा अधोरेखित केली आहे. २३ ते २४ जानेवारी २०२६ दरम्यान बंगळुरू येथे आयोजित REEV (Range Extended Electric Vehicle) 2026 स्पर्धेत देशभरातील ८ सधानी सहभाग नोंदवला. या स्पर्धेचा मुख्य उ‌द्देश रेंज एक्सटेंडेड इलेक्ट्रिक वाहनाची रचना, निर्मिती आणि सादरीकरण हा होता. विजेत्या संघाला ११ लाख रोख पारितोषिक व विजेतेपदाचा किताब प्रदान करण्यात आला. २ ते ३ एप्रिल २०२६ रोजी महात्मा फुले कृषी वि‌द्यापीठ, राहुरी येथे आयोजित TIFAN 2026 या राष्ट्रीय स्पर्धेत मल्टी ट्रान्सप्लांटर यंत्राची निर्मिती व कार्यप्रदर्शन या संकल्पनेवर आधारित स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत देशभरातील तब्बल ३८ संघांनी सहभाग घेतला. या स्पर्धेतही विजेत्या संघाला २० लाख रोख पारितोषिक देण्यात आले. अशी माहिती महावि‌द्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. ए. वेंकटेश यांनी दिली.

        REEV 2026 स्पर्धेत देशभरातील ८ संघांनी सहभाग नोंदवला. अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मेकॅनिकल विभागातील Team TurboTitans या संघाने उत्कृष्ट तांत्रिक कौशल्य, नावीन्यपूर्ण डिझाईन आणि प्रभावी सादरीकरणाच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला. या संघात एकूण ३० वि‌द्यार्थ्यांचा सहभाग होता. संघाने विकसित केलेल्या वाहनामध्ये कार्यक्षम ऊर्जा व्यवस्थापन, मजबूत संरचना आणि आधुनिक अभियांत्रिकी तत्त्वांचा उत्कृष्ट वापर दिसून आला. परीक्षकांनी संघाच्या सादरीकरणाची आणि तांत्रिक स्पष्टतेची विशेष दखल घेतली. विजेत्या संघाला ११ लाख रोख पारितोषिक व विजेतेपदाचा किताब प्रदान करण्यात आला. २ ते ३ एप्रिल २०२६ रोजी महात्मा फुले कृषी वि‌द्यापीठ, राहुरी येथे आयोजित TIFAN 2026 या राष्ट्रीय स्पर्धेत मल्टी ट्रान्सप्लांटर यंत्राची निर्मिती व कार्यप्रदर्शन या संकल्पनेवर आधारित स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत देशभरातील तब्बल ३८ संघांनी सहभाग घेतला. संघनायक अनिकेत दुशिंग, उपसंघनायक गौरव फरगडे आणि मार्गदर्शक प्रा. बाबासाहेब वर्षे यांच्या नेतृत्वाखाली संघाने उल्लेखनीय कामगिरी केली.TIFAN 2026 मध्ये Mavericks 8.0 या संघाने सर्व फेऱ्यांमध्ये सातत्यपूर्ण आणि प्रभावी कामगिरी करत प्रथम क्रमांक मिळवला. या संघात २० विद्यार्थ्यांचा सहभाग होता. संघाने विकसित केलेल्या मल्टी ट्रान्सप्लांटर यंत्राने कार्यक्षमतेल, अचूकतेत आणि उत्पादकतेत उच्च दर्जा गाठला. स्पर्धेदरम्यान सर्वाधिक रोपे लावण्याचा मान या संघाने मिळवत परीक्षकांकडून विशेष कौतुक मिळवले. याशिवाय संघाने खालील मानाचे पुरस्कारही पटकावलेः Robust & Reliable Prototype – विजेता, Milestone Achievement Award विजेता, Best Cost Effective Prototype उपविजेता. या स्पर्धेतही विजेत्या संघाला ११ लाख रोख पारितोषिक देण्यात आले. संघनायक प्रणव तांबे, उपसंघनायक अभिजित सातपुते आणि मार्गदर्शक प्रा. बाबासाहेब वर्षे यांच्या नेतृत्वाखाली संघाने उत्कृष्ट कामगिरी केली. या दुहेरी यशामागे वि‌द्यार्थ्यांची वर्षभराची अथक मेहनत. रात्रंदिवस केलेले परिश्रम, अचूक नियोजन आणि प्राध्यापकांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. प्रकल्पासाठी आवश्यक सुविधा व संसाधने वेळेवर उपलब्ध करून देण्यासाठी विभागप्रमुख डॉ. व्ही. डी. वाकचौरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. राष्ट्रीय स्तरावर पारितोषिक मिळाल्याब‌द्दल संस्थेचे अध्यक्ष तथा माजी महसूल मंत्री मा. आ. बाळासाहेब थोरात. विश्वस्त डॉ. सुधीरजी तांबे. सौ. शरयूताई देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनिल शिंदे, डायरेक्टर अकॅडेमिक्स डॉ. जे. बी. गुरव, प्राचार्य डॉ. एम. ए. वेंकटेश, रजिस्ट्रार प्रा. व्ही. पी. वाघे तसेच सर्व विभाग प्रमुख यांनीही संघांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रीय स्तरावर सलग दोन प्रतिष्ठित स्पर्धामध्ये प्रथम क्रमांक मिळवून अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्‌यालयाने अभियांत्रिकी शिक्षणातील उत्कृष्टता, नवोपक्रम आणि वि‌द्यार्थ्यांची क्षमता यांचे दिमाखदार प्रदर्शन केले आहे. हे यश केवळ महावि‌द्यालयासाठीच नव्हे तर संपूर्ण परिसरासाठी अभिमानास्पद ठरले असून भविष्यातील संशोधन व तांत्रिक प्रगतीस नवी दिशा देणारे आहे. – – 
–  व्यवस्थापकीय विश्वस्त सौ. शरयू देशमुख (अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्था)
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!