ब्रेकिंग

रमेश मोरे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पी.एच.डी

रमेश मोरे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पी.एच.डी

रमेश मोरे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पी.एच.डी

संगमनेर । प्रतिनिधी ।   डॉ.रमेश हरिभाऊ मोरे यांना व्यवस्थापन शाखेतून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून पी.एच.डी पदवी  प्रदान करण्यात आली.डॉ. रमेश मोरे यांनी “Role Of Professional Educational Institutions In Employment Generation & Entreprenurship Development With Reference To Ahilyanagar & Nashik District”. या विषयावर डॉ. संदीप निंबाळकर यांचे मार्गदर्शना खाली आपला प्रबंध सादर केला.

       सदरचा प्रबंध इंजिनिअरिंग कॉलेज,फार्मसी व एम.बी.ए कॉलेज मधील विद्यार्थ्यांसाठी खूपच उपयुक्त असून व्यवसायिक शिक्षण देणा-या संस्थानी नोकरी व स्वयंरोजगार वाढविण्यासाठी नक्की काय केले पाहिजे ? यावर हा प्रबंध मार्गदर्शन करतो.या प्रबंधामधील शोध व संदेश यांच्या माध्यमातुन स्वायत्त शिक्षण देणा-या संस्थांना त्यांचे अभ्यासक्रम बदलण्यास भाग पाडले जाणार असून त्यामधुन त्यांना नोकरीस व स्वयंरोजगारास योग्य असे अभ्यासक्रमात तयार करावे लागणार आहे.यामधुन देशाच्या विकासाला देखिल चालना मिळणार आहे.  सदरचा प्रबंध तयार करण्यासाठी डॉ.रमेश मोरे यांना अनेक शिक्षण तज्ञांचे मार्गदर्शन लाभले आहे.त्यांचे या शोध कार्यासाठी अमृतवाहिनी संस्थेचे अध्यक्ष मा.आ.बाळासाहेब थोरात साहेब,कार्यकारी विश्वस्त सौ.शरयुताई देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी  अनिल शिंदे, डायरेक्टर ॲकेडेमिक डॉ जे.बी.गुरव,डॉ.बाबा लोंढे तसेच अमृतवाहिनी शिक्षण संकुलातील विविध प्राचार्यांनी त्यांचे कौतुक केले आहे.व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!