ब्रेकिंग

के.जे.सोमैया महाविद्यालयात कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह द्वारे 259 विद्यार्थ्यांना नोकऱ्या

के.जे.सोमैया महाविद्यालयात कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह द्वारे 259 विद्यार्थ्यांना नोकऱ्या
18 कंपन्यांनी महाविद्यालयात येऊन बुद्धिमत्ता चाचणी आणि  प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे  विद्यार्थ्यांची केली निवड
कोपरगांव । प्रतिनिधी । के. जे. सोमैया वरिष्ठ व के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयात  कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्हचे आयोजन करण्यात आले. या कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह मध्ये 259  विद्यार्थ्यांची निवड झाली आहे, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉ. विजय ठाणगे यांनी दिली.  
डॉ. ठाणगे पुढे म्हणाले की, “कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह मध्ये एकूण 18 कंपन्यांनी महाविद्यालयात येऊन बुद्धिमत्ता चाचणी आणि  प्रत्यक्ष मुलाखती द्वारे या विद्यार्थ्यांची निवड केली. यामध्ये प्रामुख्याने ॲक्सिस बँक, महिंद्रा अँड महिंद्रा, इनोवा सोर्स, जीनियस हार्टेक लिमिटेड,  आर्म इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, पूनावाला फिनकॉर्व, टीव्हीएस ट्रेनिंग अँड सर्विसेस, टाटा मोटर्स लिमिटेड, क्वेस कॉर्प, झिटेक सर्व्हिसेस, क्रॉनिक डिजिटल, स्वाारुद्र सोल्युशन, महालक्ष्मी मारुती सुझुकी नेक्सा शोरूम, रुरल शोर, श्रीराम फायनान्स, कोटक बँक लिमिटेड, ॲक्सिस बँक, टेक्नो ग्रुप सॉफ्टवेअर सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड इत्यादी कंपन्यानी कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह साठी महाविद्यालयास भेट दिली. ग्रामीण भागातील महाविद्यालय असताना देखील इतक्या मोठ्या संख्येने कंपन्यांनी महाविद्यालयात भेट दिली आणि बँकिंग, इन्शुरन्स, फायनान्स, आयटी, सॉफ्टवेअर टेस्टिंग अँड डेव्हलपमेंट, सेल्स, मॅन्युफॅक्चरिंग अशा विविध क्षेत्रात बहुसंख्य विद्यार्थ्यांची निवड झाल्याचा विशेष आनंद आहे.”  याप्रसंगी महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रोफेसर डॉ. रवींद्र जाधव म्हणाले की, “या शैक्षणिक वर्षात एकूण तीन कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले व यामध्ये बी. ए., बी. कॉम., बी.एस्सी. बी.सी. ए., बी.सी.एस., एम. कॉम., एम. ए, एम. सी. ए, एम. एस्सी. इत्यादी वर्गातील विद्यार्थ्यांना या कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हद्वारे रोजगार उपलब्ध झाला. यासाठी महाविद्यालयामध्ये स्वतंत्रपणे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलच्या माध्यमातून काम केले जाते. महाविद्यालयाने विद्यार्थ्यांच्या डेव्हलपमेंट साठी स्वतंत्र ट्रेनिंग ऑफिसर ची नेमणूक केलेली असून यामध्ये विद्यार्थ्यांना इंटरव्यू स्किल्स, रिझ्युम रायटिंग स्किल्स, सॉफ्ट स्किल व नोकरीसाठी लागणारे विविध कौशल्य यांचे प्रशिक्षण देण्यात येते. तसेच या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना नोकरी मिळवण्यात यश मिळावे या हेतूने चार ट्रेनिंग प्रोग्रामचे आयोजन करण्यात आले. यामध्ये नांदी फाउंडेशन चा महिंद्रा प्राइड क्लासरूम्स एम्प्लॉयबिलिटी विथ इन्फती फॉर गर्ल्स, रिलायन्स फाउंडेशन चा ट्वेंटी फर्स्ट सेंचुरी स्किल प्रोग्राम, बजाज फिन्सर्व्ह चा सर्टिफिकेट कोर्स इन बँकिंग फायनान्स आणि इन्शुरन्स आणि स्वामी लॉजिपूल चा सॉफ्टवेअर टेस्टिंग अँड डेव्हलपमेंट इंटर्नशिप प्रोग्राम यांचे यशस्वी आयोजन केले असल्याची माहिती दिली. या कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हस च्या आयोजनामध्ये ट्रेनिंग ऑफिसर प्रा. नेहा गुरावे व प्लेसमेंट ऑफिसर प्रा. विजय सोमासे यांच्यासह प्रा.डॉ. संजय  अरगडे, प्रा .सचिन जाधव, प्रा. प्रवीण गुडघे, प्रा. विशाल जगधने, प्रा. ओमप्रकाश धनवटे,  प्रा. निवृत्ती माळी, प्रा.डॉ. वसुदेव साळुंके, रजिस्ट्रार डॉ. अभिजीत नाईकवाडे यांच्यासह सर्व विभागातील प्राध्यापकांनी यशस्वी आयोजनामध्ये  सहभाग घेतला.  कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह चे यशस्वी आयोजन केल्याबद्दल कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. अशोकराव रोहमारे, सचिव अँड. संजीव कुलकर्णी व सदस्य मा. संदीप रोहमारे यांनी विशेष अभिनंदन केले.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!