ब्रेकिंग

लोणी बुद्रुक येथील अखंड हरिनाम सप्ताह व कीर्तन महोत्सवास सुरुवात

लोणी बुद्रुक येथील अखंड हरिनाम सप्ताह व कीर्तन महोत्सवास सुरुवात

लोणी बुद्रुक येथील अखंड हरिनाम सप्ताह व कीर्तन महोत्सवास सुरुवात

लोणी । प्रतिनिधी । सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या ४६ व्या पुण्यतिथी निमित्ताने प्रवरा परिवाराच्या वतीने अभिवादन करण्यात आले. लोणी बुद्रुक येथील सात दिवसांच्या अखंड हरिनाम सप्ताह व कीर्तन महोत्सवाचा शुभारंभ जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते घटस्थापना करून करण्यात आला.

कारखाना कार्यस्थळावरील स्मृतिस्थळावर जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. सभापती ज्ञानेश्वर गोंदकर यांच्यासह प्रवरा उद्योग समूहातील सर्व संस्थांचे पदाधिकारी व संचालक उपस्थित होते.सहकारी साखर कारखानदारीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांची ४६ वी पुण्यतिथी व पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या ९४ व्या जयंती निमित्ताने लोणी ग्रामस्थांच्या वतीने यावर्षी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले आहे.सप्ताहाचा शुभारंभ माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, सौ. शालिनीताई विखे पाटील व सौ. धनश्री विखे पाटील यांच्या हस्ते घटस्थापना आणि गाथा पूजन करून करण्यात आला.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!