ब्रेकिंग

के. बी. रोहमारे महाविद्यालयाची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम

जाहिरात मो-7756045689
के. बी. रोहमारे महाविद्यालयाची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम

के. बी. रोहमारे महाविद्यालयाची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम

कोपरगांव । प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने घेतलेल्या यावर्षीच्या बारावी बोर्ड परीक्षेत के. बी. रोहमारे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाने उज्वल यशाची परंपरा कायम ठेवत कोपरगाव परिसरासह जिल्ह्यात आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेचा ९५% निकाल लागला असून या शाखेत कु. सायली योगेश वदक ही ७९% गुण मिळवून प्रथम आलेली आहे. तसेच रुपेश वाल्मीक वाणी हा ७७.५०% तर कु. भक्ती संदीप इंगळे ही ७४.३३% गुण मिळवून अनुक्रमे द्वितीय व तृतीय आले आहेत.

वाणिज्य शाखेचा ८६% निकाल लागला असून वाणिज्य शाखेत विनीत नितीन आढाव हा ९०.३३% गुण मिळवून प्रथम आला आहे. तसेच कु. वेदांती गजेंद्र आदमाने ही ८५.८३% तर कु. रितिका रवींद्र देशमुख ही ८५.३३% गुण मिळवून अनुक्रमे द्वितीय व तृतीय आले आहे.कला शाखेचा ६७% निकाल लागला असून शाखेत कु. खतिजा मोयद्दिन शेख ही ८१% गुण मिळवून प्रथम आलेली आहे. तसेच कु. साक्षी बाबुराव खंडागळे ही ७७.५०% तर कु. दिव्या नितीन तांबे ही ७७% गुण मिळवून अनुक्रमे द्वितीय व तृतीय आले आहेत.के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाला नुकताच महाराष्ट्र शासनाच्या शाळा गुणवत्ता मुल्यांकान व आश्वासन आराखडा (SQAAF) या मुल्यांकानात अ+ श्रेणी हा दर्जा मिळालेला आहे. ही श्रेणी मिळवलेले हे जिल्ह्यातील एकमेव महाविद्यालय आहे. आजच्या या निकालाने महाविद्यालयाच्या शिरोपचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. विद्यार्थ्यानी मिळविलेल्या या यशाबद्दल कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. अशोकराव रोहमारे, सचिव अ‍ॅड. संजीव कुलकर्णी, विश्वस्त संदीप रोहमारे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय ठाणगे, उपप्राचार्य प्रा. बाळासाहेब सोनवणे, रजिस्ट्रार डॉ. अभिजीत नाईकवाडे आदींनी सर्वच गुणवंत विद्यार्थी तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे अभिनंदन केले आहे. महाविद्यालयाने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखल्याबद्दल सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयाची प्रवेश प्रकिया सुरु झालेली असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे उत्कृष्ट नोकरीची हमी देणारे अभ्यासक्रम बी.एस्सी. (कम्प्युटर सायन्स), बी.कॉम.(सीए.), बी.एस्सी.(सीए.), बी. एस्सी. (मायक्रोबायोलॉजी) चे प्रवेश सुरु झाले आहेत. तसेच महाविद्यालयाने काळाची गरज ओळखून B.Sc. Data Science आणि B.Sc. Artificial Intelligent & Machine Learning हे दोन अत्याधुनिक नवीन कोर्सेस सुरू केलेले आहेत. या कोर्सेससाठी प्रवेश क्षमता मर्यादित असल्याने विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश लवकरात लवकर निश्चित करावा, असे आवाहन प्राचार्य प्रो. डॉ. विजय ठाणगे यांनी केले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!