ब्रेकिंग
यशाची परंपरा राखत,पुन्हा के.बी.रोहमारे महाविद्यालय जवळकेचा 100 टक्के निकाल

यशाची परंपरा राखत,पुन्हा के.बी.रोहमारे महाविद्यालय जवळकेचा 100 टक्के निकाल

यशाची परंपरा राखत,पुन्हा के.बी.रोहमारे महाविद्यालय जवळकेचा 100 टक्के निकाल
कोपरगांव । प्रतिनिधी । पुणे विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने फेब्रुवारी/ मार्च 2025 / 26 मध्ये घेतलेल्या इ.12वी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून कोपरगाव तालुक्यातील जवळके येथील के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल उत्कृष्ट लागला आहे.

महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेत घवघवीत यश संपादित केले आहे. विज्ञान शाखेत कु.गायत्री दादासाहेब पाचोरे 69.00टक्के गुण मिळून प्रथम क्रमांक मिळवला आहे. कु.विजय बाळासाहेब गुंजाळ 68.00 टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे.तसेच कु.साक्षी विकास देशमुख 65.50 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. वाणिज्य शाखेत कु.रोहिणी सुभाष कांडेकर 82.00टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला आहे. कु.श्रावणी शरद कोल्हे हिने 80.33 टक्के मिळुन द्वितीय क्रमांक मिळवला आहे. तसेच कु.पल्लवी वसंत मोरे 78.33 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे.यशस्वी विद्यार्थ्यांचे कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे,सचिव संजीव कुलकर्णी, संदीपराव रोहमारे, सुजितराव रोहमारे, प्राचार्य डॉ. वी.सी.ठाणगे जवळके महाविद्यालयाचे उपप्राचार्य. एस.पी. रहाणे सर तसेच शालेय व्यवस्थापन समिती सदस्य तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आदींनी अभिनंदन केले.


