ब्रेकिंग
एमपीएससी परीक्षेत तालुक्यातील विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश कौतुकास्पद – डॉ जयश्रीताई थोरात

एमपीएससी परीक्षेत तालुक्यातील विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश कौतुकास्पद – डॉ जयश्रीताई थोरात

तालुक्यातील 14 विद्यार्थ्यांची पीएसआय पदावर निवड
संगमनेर । प्रतिनिधी । माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्याने कायम गुणवत्तेच्या बाबतीत उत्तुंग भरारी घेतली आहे. तालुक्यातील ,ग्रामीण भागातील 14 विद्यार्थ्यांनी एमपीएससी स्पर्धा परीक्षेत कठोर मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर पोलीस उपनिरीक्षक पद मिळवले आहे. हे संपूर्ण संगमनेरकरांसाठी अभिमानास्पद असल्याचे गौरवोद्गार डॉ जयश्रीताई थोरात यांनी काढले आहे.

नुकतेच एमपीएससी परीक्षेचे निकाल जाहीर झाले असून त्यात तालुक्यातील 14 विद्यार्थ्यांनी पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय ) हे महत्त्वाचे पद मिळवले आहे. या विद्यार्थ्यांच्या डॉक्टर जयश्रीताई यांनी यांनी सत्कार केला व शुभेच्छा दिल्या.यात नवनाथ आप्पासाहेब ढवळे (काकडवाडी), सचिन नंदू दिघे (तळेगाव), महेश बाळासाहेब बोऱ्हाडे (वडगाव लांडगा), रुपेश नारायण वाकचौरे (संगमनेर शहर), सुरज गौतम शेरमाळे (समनापुर), चेतन सोमनाथ घाणे (मोधळवाडी), सुनिता रंगनाथ धुळगंड (मांडवे बुद्रुक), रमेश शहाजी पवार (खरशिंदे), निवृत्ती लहानु गुळवे (वेल्हाळे), सचिन भिकाजी बर्डे (शेडगाव), सागर विलास बटवाल (ढोलेवाडी), संतोष सूर्यभान सागर (बिरेवाडी), अक्षय पोपट फापाळे (सावरगाव तळ) आणि वैशाली हरिदास पन्हाळे (संगमनेर शहर ) या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

यावेळी बोलताना डॉ जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, 14 विद्यार्थ्यांनी मिळवलेली यश हे तालुक्यातील नवीन पिढीसाठी प्रेरणादायी असून इतर सर्व विद्यार्थ्यांनी त्यांचे अनुकरण करावे याचबरोबर या विद्यार्थ्यांच्या पाठीशी त्यांचे कुटुंबीय मार्गदर्शक म्हणून उभे राहिले आणि त्यामुळे यांनी यश मिळवले. यश मोठे आहे कामही मोठे आहे आगामी काळात प्रामाणिकपणा कायद्याचे ज्ञान घेऊन निर्णयक्षमता वाढवत प्रलोभने टाळावी व तालुक्याचा लौकिक वाढवावा असे आवाहन त्यांनी नवनिर्वाचित अधिकाऱ्यांना केले. दैदीप्यमान यश मिळवणाऱ्या या सर्व १४ विद्यार्थ्यांचे माजी शिक्षण मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात, मा. आ डॉ सुधीर तांबे ,आ सत्यजित तांबे , सौ दुर्गाताई तांबे, डॉ जयश्रीताई थोरात, इंद्रजीत भाऊ थोरात यासह संपूर्ण तालुक्याने अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.


