अमृतवाहिनी बी फार्मसी महाविद्यालयात नक्षत्र 2026 सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न
जाहिरात मो-7756045359
अमृतवाहिनी बी फार्मसी महाविद्यालयात नक्षत्र 2026 सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न
संगमनेर । प्रतिनिधी । अभ्यासाच्या धकाधकीतून थोडासा विरंगुळा आणि व्यक्तिमत्व विकासाकरता अमृतवाहिनी बी फार्मसी महाविद्यालयात नक्षत्र 2026 या झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात देशातील विविध संस्कृतींचा सुरेख मिला पाहायला मिळाला असून विद्यार्थ्यांच्या जीवनात हा मोठा अनमोल ठेवा ठरला आहे.
अमृतवाहिनी बी फार्मसी महाविद्यालयात नक्षत्र 2026 ची सुरुवात ट्रॅडीशनल डे ने झाली. यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध पारंपारिक वेशभूषा केली याचबरोबर बॉलीवूड आणि हॉलीवुड डे सुद्धा साजरा करण्यात आला यामध्ये आवडत्या चित्रपटात कलाकारांचे वेशभूषा व केशभूषा विशेष आकर्षण ठरल्या तर स्नेहसंमेलन कार्यक्रमांमध्ये अहिराणी नृत्य गोंधळी नृत्य फ्युजन सॉंग सोलो सॉंग लावणी मराठी गाणे यांनी धमाका उडून दिला. सुंदर आयोजन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग आकर्षक वेशभूषा लाईट डेकोरेशन आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या कलागुणांना वाव देण्यासाठी असलेल्या महोत्सव हा विद्यार्थ्यांसाठी संस्मरणीय अनुभव ठरला.यावेळी बोलताना सौ शरयू ताई देशमुख म्हणाल्या की महाविद्यालयीन जीवन हे अत्यंत महत्त्वाचे असते या कालावधीमध्ये तुमच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक पैलू पडतात अभ्यासाबरोबर विद्यार्थ्यांमध्ये जे विविध गुण असतात त्यांना व्यासपीठ निर्माण करण्यासाठी विविध उपक्रमाचे आयोजन केले जाते. मेडिकल क्षेत्रामध्ये असणारे हे विद्यार्थी नक्षत्र 2026 कायम स्मरणा ठेवतील अशा त्या म्हणाल्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ मच्छिंद्र चव्हाण यांनी केले.कलाविष्कारातील उत्कृष्ट सहभागाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा माजी शिक्षण मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ सुधीर तांबे ,संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त सौ शरयू ताई देशमुख ,मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे ,अकॅडमी डायरेक्टर डॉ जे बी गुरव, प्राचार्य डॉ एम.जे चव्हाण यांनी अभिनंदन केले आहे.