आ. आशुतोष काळेंच्या लोकहिताच्या दृष्टीकोनातून प्रशासन आणि नागरीकांमधील दरी कमी
महाराजस्व समाधान शिबिरातून सेवा तुमच्या दारी संकल्पना प्रत्यक्षात उतरली

आ. आशुतोष काळेंच्या लोकहिताच्या दृष्टीकोनातून प्रशासन आणि नागरीकांमधील दरी कमी


महाराजस्व समाधान शिबिरातून सेवा तुमच्या दारी संकल्पना प्रत्यक्षात उतरली
कोपरगांव । प्रतिनिधी । कोपरगाव मतदार संघातील नागरीकांना आवश्यक असलेले सर्व प्रकारचे शासकीय दाखले एकाच छ्ताखाली आणि एकाच वेळी कमी वेळेत आणि कमीत कमी त्रासात उपलब्ध व्हावेत यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबीराचे मत्दर संघातील प्रत्येक महसूल मंडळात प्रभावीपणे आयोजन केल्यामुळे ‘महसूलची सेवा तुमच्या दारी’हि संकल्पना प्रत्यक्षात उतरली असल्याचे समाधानकारक चित्र सोमवार (दि.११) रोजी कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील दहेगाव बोलका याठिकाणी पहावयास मिळाले. महायुती शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान अंतर्गत नागरिकांचे शासकीय विभागांशी संबंधित प्रश्न सोडविण्यासाठी आ. आशुतोष काळे यांच्या पुढाकारातून दहेगाव बोलका मंडळात महाराजस्व अभियान समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे सर्वसामान्य जनता, शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी आणि महिला यांना प्रशासकीय कामांसाठी कार्यालयात वारंवार फेऱ्या मारण्याचा त्रास वाचला असून आ.आशुतोष काळे यांच्या पुढाकारातून महादेव मंदिर दहेगाव बोलका येथे आयोजित महाराजस्व शिबिरात अनेक नागरीकांना हवे असलेले विविध दाखले एकाच दिवसात आणी अतिशय कमी वेळात मिळाली आहे. यावेळी उपस्थितांच्या हस्ते नागरिकांना विविध दाखल्यांचे, प्रमाणपत्र, उतारे आणि इ रेशन कार्ड चे वितरण करण्यात आले.

सर्वसामान्य नागरीकांन शासकीय कामांसाठी अनेक वेळा कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागत होत्या. मात्र ‘महाराजस्व’ अभियानामुळे नागरिकांची ही गैरसोय मोठ्या प्रमाणात दूर झाली आहे. प्रशासनाच्या समन्वयातून नागरिकांना आवश्यक कागदपत्रे जलद गतीने मिळत असल्याने वेळ आणि श्रम दोन्हींची बचत होत आहे. या अभियानांतर्गत उत्पन्न दाखला, रहिवासी दाखला, जात प्रमाणपत्र, नॉन-क्रीमीलेअर आदी महत्त्वाचे दाखले सहज उपलब्ध करून दिले जात आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांना या उपक्रमाचा मोठा फायदा होत असून, शासकीय सेवा अधिक पारदर्शक आणि लोकाभिमुख होत असल्याची भावना नागरीकांकडून व्यक्त केली जात आहे.यावेळी नायब तहसीलदार चंद्रशेखर कुलथे, मंडलाधिकारी अनिल मांढरे, कोपरगाव जिनिंग व प्रेसिंग सोसायटीचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, दहेगाव बोलकाचे सरपंच भरत चौधरी, उपसरपंच रितेश वल्टे, भोजडेचे सरपंच सुधाकर वादे, लौकीचे सरपंच आजीनाथ खटकाळे, शिवाजीराव ठाकरे, दिगंबर जाधव, राजेंद्र खिलारी, बबनराव भवर, भाऊराव देवकर, विजय टूपके, चंद्रकांत जाधव, भागीनाथ शेळके, जगनराव बागल, जनार्दन भवर, सुनिल वालतुरे, बद्रीनाथ वल्टे, सिद्धेश्वर वारकर, नानासाहेब डोंगरे, गोपाल कुलकर्णी, शासकीय अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



