राजकिय

यशोधन कार्यालयाच्या पाठपुराव्यातून जळालेल्या ट्रान्सफॉर्मर ठिकाणी नवीन 300 ट्रांसफार्मर

शेतकरी व सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी यशोधन कटिबद्ध

यशोधन कार्यालयाच्या पाठपुराव्यातून जळालेल्या ट्रान्सफॉर्मर ठिकाणी नवीन 300 ट्रांसफार्मर

संगमनेर । प्रतिनिधी । महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते राज्याचे माजी महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली यशोधन जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून तालुक्यातील जळालेल्या 300 ट्रांसफार्मरच्या ठिकाणी नव्याने 300 ट्रांसफार्मर विविध गावांमध्ये बसवण्यात आले आहे.संगमनेर तालुका हा विस्ताराने मोठा असून 171 गावे व 258 वाड्या वाचल्या आहेत. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात विद्युतीकरणाचे जाळे निर्माण करण्यात आले आहे. मागील काही महिन्यातील वाढलेली उष्णता यामुळे शेती व घरगुती वापरासाठी विजेचा जास्त प्रमाणात वापर झाला. अनेक ठिकाणी ट्रांसफार्मर जळाल्याने शेतकऱ्यांनी यशोधन कार्यालयाकडे नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्याकरता सातत्याने पाठपुरावा केला. त्यातून शेतकऱ्यांना हा दिलासा मिळाला आहे

कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात व इंद्रजीत भाऊ थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली यशोधन कार्यालयात तालुक्यातील नागरिकांच्या विजेच्या समस्या सोडवण्यासाठी मागील दहा वर्षापासून स्वतंत्र कक्ष कार्यरत आहे. त्या माध्यमातून तालुक्यातील नागरिकांच्या विजेबाबतच्या अडचणी सातत्याने सोडवल्या जातात.यशोधन कार्यालयाच्या वतीने आलेल्या शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेत त्यांच्या जळालेल्या ट्रान्सफॉर्मरच्या ठिकाणी नव्याने ट्रान्सफॉर्मर मिळावा याकरता शासनाच्या वीज वितरण विभागाकडे पाठपुरावा करण्यात आला. या माध्यमातून तालुक्यात 300 नवीन 63 केव्ही व 100 के व्ही चे ट्रांसफार्मर बसवण्यात आले. यामध्ये तळेगाव, साकुर, वडगाव पान, जोर्वे धांदरफळ, आश्वी, घुलेवाडी, समनापुर गटामधील  विविध गावांमध्ये बसवण्यात आले आहे.  वीज पुरवठा नियमित व सुरळीत व्हावा याकरता या ट्रांसफार्मरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठी मदत होत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. लोहारे येथील कदम , अभंग व पवार वस्ती येथे या योजनेअंतर्गत 100 केव्ही ट्रांसफार्मर उपलब्ध करून देण्यात आला. हा ट्रांसफार्मर दिल्याबद्दल गावकऱ्यांनी लोकनेते बाळासाहेब थोरात यांचे आभार व्यक्त केले याप्रसंगी हौशीराम सोनवणे,संजय साहेबराव पोकळे,संचालक राजहंस बाळासाहेब कारभारी पोकळे संचालक,राजहंस ट्रान्सपोर्ट, रेवणनाथ कदम, अरुण पोकळे, डॉ संदीप पोकळे, बापू पवार, नवनाथ कदम, दिनकर पोकळे, शांताराम कदम, विजय रणमळे, किसन रणमळे,अगस्ती साळवे, यशोधन कार्यालय वीज विभागाचे योगेश पोकळे यांच्यासह विविध नागरिक उपस्थित होते.


शेतकरी व सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी यशोधन कटिबद्ध
लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील शेतकऱ्यांच्या व सर्वसामान्य नागरिकांच्या विविध प्रश्नांसाठी यशोधन कार्यालयाच्या माध्यमातून शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करून त्यांचे प्रश्न तात्काळ सोडवले जातात. विविध गावांमधील शेतकऱ्यांनी केलेल्या मागणीवरून त्यांचे जळालेले ट्रान्सफॉर्मर वीज वितरण विभागाच्या सहकार्याने नव्याने बसवण्यात आल्याने शेतकऱ्यांना नक्की दिलासा मिळणार आहे

डॉ जयश्रीताई थोरात
संगमनेर तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!